क्रीडा

वैभव सूर्यवंशीचे वादळी शतक,फक्त ३५ चेंडूत रचला इतिहास…!

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सुर्यवंशी या १४ वर्षीय खेळाडूने फक्त ३५ चेंडूत १०० धावा केल्या.वैभवच्या नावावर या शतकाने अनेक “विश्वविक्रम” केले आहेत…

१) आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक पूर्ण केले…
२) एका इनिंग मध्ये सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू…
३) टी २० च्या इतिहासात सर्वांत कमी वयात शतक बनवणारा खेळाडू…

भारतीय क्रिकेट विश्वाला मिळालेला नवा हिरा,वैभव सुर्यवंशी…

क्रिकेटच्या मैदानावर आज एक अद्भुत खेळी पाहायला मिळाली.वैभव सूर्यवंशी या तडाखेबाज फलंदाजाने केवळ ३५ चेंडूत शतक ठोकत प्रेक्षकांना रोमांचित केले,त्याच्या या आक्रमक खेळीने केवळ संघाच्या विजयाचे दार उघडले नाही तर क्रिकेटप्रेमींच्या हृदयातही कायमची जागा निर्माण केली…

वैभवने मैदानात पाऊल ठेवताच खेळाचे चित्रच पालटले.पहिल्या काही चेंडूत सेट झाल्यानंतर त्याने चौकार-षटकारांचा जबरदस्त वर्षाव सुरू केला.त्याच्या बॅटमधून निघणारे फटके पाहताना स्टेडियम अक्षरशः थरथरत होते.विशेष म्हणजे त्याने या खेळी दरम्यान ११ षटकार आणि ७ चौकार लगावले…

त्याच्या शतकानंतर संपूर्ण मैदानात जल्लोष उसळला.प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते तर सहकारी खेळाडूंच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता.वैभवची ही खेळी केवळ आक्रमकतेचा नमुना नव्हती,तर त्यात संयम,कौशल्य आणि आत्मविश्वास यांचंही अप्रतिम मिश्रण होतं…

क्रिकेटमध्ये अशा वादळी खेळी फारशा पाहायला मिळत नाहीत.वैभव सूर्यवंशीने आज आपल्या नावे एक संस्मरणीय कामगिरी नोंदवली आणि स्वतःचे नाव उंचावले.त्याच्या या पराक्रमाची चर्चा आता सर्वत्र रंगत आहे…

अशाच दमदार कामगिरीसाठी वैभवला टाइम्स 9 न्यूज नेटवर्क तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा आणि भविष्यातील सामन्यांसाठी पुढील यशाच्या हि हार्दिक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button