महाराष्ट्र

खडी क्रशींग प्लॅटमधील रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी चोरी करणारा आरोपीस काळेपडळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी… रियाज मुलाणी

दि. २१/०४/२०२५ रोजी बडाची वाडी पुणे येथे चालू असलेल्या खडी क्रशींग कामासाठी लागणाऱ्या क १८,९६,०००/- किमतीच्या १५ मोटारी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी कैले बाबत काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा रजि नंबर १३७/२०२५ भा.न्या. सं कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल होता, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास पथकास गुन्हातील आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या.

तपासपथकातील पोलीस अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे आकाश संजय मोरे रा. रामटेकडी हडपसर पुणे याने सदर प्लांट वरील कामास असलेल्या त्याच्या मित्राचे मदतीने केला आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना सदर इसमास रामटेकडी, हडपसर येथे सापळा लावून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे मित्राचे मदतीने गुन्हा केल्याचे कबुल आहे. त्यांनी खड़ी बारीक करण्याच्या एकूण १५ मोटारी चोरी केल्या असून त्या जड असल्याने अज्ञात ठिकाणी ताडपत्रीखाली लपवून ठेवल्या होत्या, नंतर ते मंगार दुकानात विकणार असले बाबत तपासात निष्पन्न झाले आहे. सदर इसमाकडून एकुण रु १८,९६,०००/- किंमतीच्या १५ मोटारी काळेपडळ पोलीस स्टेशन तपास पथकाने हस्तगत करुन गुन्ह्यात चोरी झालेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, नितीन डोले, अतुल पंधरकर, नितीन शिंदे, श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button