महाराष्ट्र

अकलूज शहर मुस्लिम समाजाने दिले प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन…

🎯 जम्मु काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ…

प्रति,
मा. उपविभागीय अधिकारी ,
माळशिरस विभाग,अकलूज .

विषय :- निष्पाप बळी घेणारे दहशतवाद्यांविरूद्ध कठोर पावले उचलण्याबाबत…

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला हा हिंदु-मुस्लिम बांधवावर झालेला हल्ला नसून मानवेतवर झालेला हा भ्याड हल्ला आहे,अशा क्रूर हल्ल्याचा अकलूज येथील समस्त मुस्लिम समाज सर्वत्र तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे…

देशाचे सार्वभौमत्व,एकता व अखंडतेला तडा देण्याचा हा केविलवाणा नापाक प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरू आहे.मात्र देशातील आम्ही सर्वच भारतीय अशां दहशतवादी कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचे बलाढ्य सामर्थ्य ठेवतो…

या दहशतवादी विरूद्ध लढाईत भारत सरकारच्या प्रत्येक कठोर कारवाई करण्याच्या भुमिकेबरोबर आम्ही मुस्लिम बांधव सहभागी आहोत.या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना अकलूज शहर व माळशिरस तालुका मुस्लिम समाज बांधवांकडून भावपूर्ण श्रध्दांजली हि आम्हीं अर्पण करतो…

माहितीसाठी प्रत रवाना :
१) मा.महामहिम राष्ट्रपती , भारत सरकार
२) मा. प्रधानमंत्री ,भारत सरकार
३) मा. गृहमंत्री , भारत सरकार

अशा आशयाचे निवेदन अकलूज विभागाच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर मॅडम यांना सादर केले असुन या वेळी बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button