सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या पोलीस ठाणे हद्दीतील महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्षाचा कारावास

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेचा विनयभंग व छेडछाड करणाऱ्या आरोपीला अवघ्या 29 दिवसात 1 वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपयांचा दंड पालघर प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.के. जी सावंत यांनी मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी सुनावला आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के.शेळके यांच्या पोलीस ठाणे हद्दीतील केळवा रोड पूर्व भागातील पीडित महिला 30 मार्च 2025 रोजी रात्री साडेआठ वाजता टिकली तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल घेऊन जात असताना आरोपी ओमकार संतोष जाधव राहणार केळवा पूर्व पिलाजी नगर) यांनी या महिलेच्या अंगावर धाव घेऊन तिचे तोंड दाबून मान पकडून तिला अडवून तिची साडी पकडून तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
यावरून या महिलेने 31 मार्च 2025 रोजी ओमकार संतोष जाधव यांच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणे तपासी अंमलदार पोलीस नाईक बी.के. भावर यांनी एका दिवसात पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्रक न्यायालयात दाखल केले होते.
या आरोपावरून सरकारी वकील श्रीमती आशा मारवाडी यांच्या युक्तिवादावरून मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी पालघर प्रथमवर्ग न्यायाधीश श्री के.जी. सावंत यांनी आरोपी संतोष जाधव याला एक वर्षाचा करावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
ही यशस्वी कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरले, पालघर विभागीय पोलिस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी भोये, पोलीस हवालदार कैलास शेळके, महेंद्र शर्मा, महिला पोलीस नाईक एन.टी.गावित, पोलीस नाईक बी.के भावर, आणि पोलीस अंमलदार ए बी मोधे यांनी केली आहे.



