क्रीडा

मुंबई इंडियन्सचा नवीन हिरा : विघ्नेश पुथुर…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

आज चेपोक स्टेडियम वर चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना झाला,या सामन्या मध्ये भाव खाऊन गेला तो केरळचा युवा खेळाडू विघ्नेश पुथुर…

विघ्नेश पुथुर चे वडील हे केरळ राज्यात असणाऱ्या त्याच्या गावात रिक्षा चालवण्याचे काम करतात,अगदी सामान्य परिस्थितीतून आलेल्या विघ्नेश पुथुर याने आज मोलाची कामगिरी करत सगळ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्या कडे वळवले…

भविष्यातील जबरदस्त बॉलर…

IPL हा तरुण खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी देतो,यावर्षी मुंबई इंडियन्स संघाने असाच एक हिरा शोधला आहे नांव त्याच विघ्नेश पुथुर… वय २३ वर्षे…

आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने ३ विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.विशेष म्हणजे,तो कोणत्याही मोठ्या टीमकडून या अगोदर खेळलेला नव्हता,पण तरीही त्याला मुंबई इंडियन्सने थेट IPL संघात स्थान दिले…

अवघ्या ३० लाखात मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतले आहे,चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्याने आज आऊट केलं.विघ्नेशला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो भविष्यातील भारतीय संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो हे मात्र तितकेच खरे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button