शहर

सफाळे टेंभीखोंडावे रेती बंदरात सक्शन पंप सह बोट असा एकूण 10 ते 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जाळून खाक.. पालघर महसूल विभाग अजित घरत यांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे रेती बंदरातून अवैधरित्या रेतीचा उपसा करणारा एक सक्शन पंप आणि लोखंडी बोट सह रेतीचा साठा शनिवारी दुपारी पालघर महसूल विभागाचे तलाठी अजित घरत यांनी धाड टाकून जप्त करून सर्व मुद्देमाल जाळून खाक केला आहे.

सफाळे टेंभीखोडावे रेती बंदरातून अवैधरित्या सक्शन पंपाने रेतीचा उपसा होत असल्याची गोपनीय माहिती पालघर महसूल विभाग टेंभीखोडावे सजा तलाठी अजित घरत यांना प्राप्त झाली होती.

या अनुषंगाने शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजता महसूल विभागाने या रेती बंदरामध्ये धाड टाकून एक लोखंडी सक्शन पंप एक लोखंडी बोट सह रेतीचा साठा असा एकूण 10 ते 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागीच जाळून खाक केला आहे.

मात्र या सक्शन पंप आणि बोटीचे मालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी या गावातील नागरिकांनी महसूल विभागाकडे मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button