महाराष्ट्र
तालुका पाककला स्पर्धेत लाटेवस्ती(महाळूंग)शाळेचे यश.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आज B.R.C. माळशिरस येथे पार पडल्या. त्या स्पर्धेमध्ये जि.प. प्रा. शाळा लाटेवस्ती च्या स्वयंपाकी श्रीम. वनिता सुभाष कुदळे यांचा द्वितीय क्रमांक आला.

त्यामध्ये त्यांनी शाकाहारी पौष्टिक थाळी बनवली होती. त्यामध्ये थालिपीठ, तिरंगा भात, तांदूळ भाकरी, ज्वारी भाकरी, तांदळाची गूळ घालून खीर तसेच पालक, माठ भाजी, वडीची आमटी, ताक इ. पौष्टिक पदार्थांसह सहभागी झाल्या होत्या.

त्यांच्या या यशाबद्दल शाळा लाटेवस्ती-(महाळूंग )शाळेचे मुख्याध्यापक श्री.दिलीप उकिरडे व शिक्षिका रेहाना तांबोळी व शाळा व्यवस्थापन समिती वतीने अभिनंदन करण्यात आले..



