हिंदु समाजातील “तो” युवक गेल्या तीस वर्षापासून करतोय रमजान चे उपवास…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
🎯 सुरेश गंभिरे नावाच्या अवलियाचे सर्वच समाज घटकातून होत आहे कौतुक…
अकलूज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पांडुरंगराव (भाऊ) देशमुख यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे हे अकलूज येथील बागवान गल्ली येथे असणाऱ्या मशिदी मध्ये रोजा इफ्तार साठी आले होते.त्या वेळी बोलताना ते म्हणाले की,मी गेली तीस वर्षे झाली रमजान महिन्याचे उपवास करत आहे.
सुरेश गंभिरे हे नुसते रोजा करण्याचे कार्य करत नसुन ते पहाटे 3 : 30 वाजले पासून मुस्लिम समाजातील आपल्या मित्रांना झोपीतून उठवण्याचे सुध्दा पुण्य कर्म करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरेश शिवाजी गंभीरे हे गेल्या तीस वर्षापासून म्हणजेच वयाच्या २८ वर्षापासून निरंतर असे रमजानचे संपूर्ण महिन्याचे रोजे करत आहेत,त्याच्या या आध्यात्मिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आज संपूर्ण देशात पाहिले तर सर्वत्र जातीवादाचे विष पेरले जात असतानाचे राजकारण फोफावत असताना सुरेश गंभिरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
अशा परिस्थितीत अकलूजमधील एक हिंदू युवक मुस्लिम समाजाचा आदर राखून तो रमजानचे महिनाभर रोजे करत असून या युवकाने आज समाजासमोर एक आदर्शच ठेवला आहे.
त्यांच्या या कार्यामुळे समाजात जातीयवादाचे विष पेरणाऱ्यांना एक प्रकारे चपराक असुन सबंध देशाला आज अशाच युवकाची गरज असून अशा युवकामुळे समाजातील जातीय विषमतेची दरी दूर होण्यास मदत होणार आहे.

मुस्लिम धर्मात रमजानचे रोजे केले जातात मात्र त्यासाठी पहाटे उठून “सहेरी” करणे म्हणजेच अल्पउपहार घेणे अनिवार्य असते मात्र सुरेश गभीरे हे सहेरीला फक्त एक खजूर आणि दोन चमचे दही घेऊन रोजाला प्रारंभ करतात विशेष म्हणजे आज आशा रखरखत्या उन्हात केवळ एक खजूर आणि दोन चमचे दहीवर दिवसभर रोजा (उपवास) करणे म्हणजे जिकरीचे आणि आव्हानात्मक आहे
सुरेश गंभीरे या अवलियाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे,त्यांच्या या कार्यामुळे तत्कालीन अकलूज ग्राम पंचायत चे माजी सदस्य दादाभाई तांबोळी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला,या वेळी बहुसंख्य रोजदार मंडळी उपस्थित होते…



