आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोषित आई कमला भवानीचा रविवारी चौथ्या माळेच्या दिवशी आरती सोहळा संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो जयघोशात आई कमला भवानीचा रविवारी चौथ्या माळे दिवशीचा आरती सोहळा संपन्न झाला आज चौथ्या माळे दिवशी रविवार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिला भाविक मोठ्या संख्येने दिसून येत होत्या आजची कमला भवानीची महापूजा रोहित पुजारी यांनी मांडली माता कमलाभवानीला केशरी रंगाचा भरजरी शालू आणि चंदन मळवट भरून सर्व अलंकार भूषित महापूजा मांडण्यात आली यावेळी तिरंगी फुलांच्या रंगांमध्ये आरास मांडण्यात आली

ही आरास माही डेकोरेशन करमाळा यांनी मांडली त्यानंतर पंचायतन आरती सोहळा संपन्न झाला यावेळी बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी ओंकार पुजारी विजय पुजारी संदीप पुजारी रत्नदीप पुजारी तुषार सोरटे सहदेव सोरटे तुकाराम सोरटे भाऊसाहेब सोरटे नारायण सोरटे अभिमान सोरटे सचिन सोरटे प्रकाश सोरटे राहुल सोरटे यांचे सह पुरोहित रविराज पुराणिक रंगनाथ पुराणिक मानकरी शिवशंकर फुलारी बबन दिवटे मनोज जामदार प्रमोद गायकवाड हनुमंत पवार लक्ष्मण हवालदार शंकर पवार ईश्वर पवार पद्माकर सूर्यपुजारी इनताज शेख इत्यादी उपस्थित होते

दुपारी पाऊस आल्याने यात्रेकरूंची आणि भाविकांची धावपळ झाली तरीही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती उद्या सोमवार पाचवी माळ असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे मनोरंजनाच्या बालगोपाळांच्या खेळांकडे भाविकांचा ओघ वाढलेला आहे उंच उंच पाळणे झोके याचा आनंद बालगोपाळ घेत आहेत