महाराष्ट्र

युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, जव्हार शाळेचा विद्यार्थी कु. रोहन नरेश कुवरे नवोदय साठी निवड

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
(मो.9028305319)
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मुलांच्या भविष्याचा उज्ज्वल पाया मजबूत करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.सी.) अभ्यासक्रमाची मोफत सोयी सह शासकीय निवासी शाळेत शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नवोदय विद्यालयाची निवड चाचणी फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आली.

घेण्यात आलेल्या या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणीमध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल, जव्हार शाळेच्या इयत्ता पाचवीत शिक्षण घेणा-या कु.रोहन नरेश कुवरे विद्यार्थ्यांने नेत्रदिपक यश संपादन करत सहावीसाठी प्रवेश मिळविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

त्याला शाळेचे शिक्षक वर्ग व मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच त्याचे वडील श्री. नरेश कुवरे व आई सौ.भारती नरेश कुवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री. इर्शाद मुल्ला, सेक्रेटरी श्री. हर्षद मेघपुरिया व सर्व संचालक मंडळ यांनी कु. रोहन नरेश कुवरे या विध्यार्थाचे अभिनंदन केले. तसेच पालक व शिक्षण प्रेमींनी यशस्वी विद्यार्थी, आई-वडील व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button