महाराष्ट्र

माढा लोकसभा मतदार संघा बाबत भाजपा चा चुकीचा निकष…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाइल नंबर 9890299499

भाजपा ने माढा लोकसभा मतदार संघा करीता ज्या सिटिंग आमदारांच्या निकषावर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना “फिर से” उमेदवारी जाहीर केली तो निकष च चुकीचा रिपोर्ट झालाय,भविष्यात हेच पाच आमदार निवडून येतील का नाही हा शंकेचा विषय असुन “महायुती” चा धर्म म्हणुन माढा लोकसभा मतदार संघाचे “पितामह” विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि फलटण चे रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब या सिनियर ना विश्वासात घेणे गरजेचे होते पण तसे न करता एखाद्या हुकूमशाह प्रमाणे ह्या दोन्हीं उमेदवाऱ्या जनतेवर अक्षरशः लादल्याने भविष्यात याचे परिणाम भाजपा ला भोगावे लागतील…

माढा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सांगोला विधानसभा मतदार संघाच्या आमदाराने तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चाळीस हजाराचे लिड देणार असे देखील जाहीर करून टाकले आहे ते मात्र 768 मताने आले होते हे माहीत असूनही…माढा लोकसभा मतदार संघातील जनता काय डोंगर,झाडी झुडपात राहते की काय…? अशा प्रकारच्या वल्गना करून काहीं जण जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करीत आहेत…

तिकडे सोलापूर लोकसभा मतदार संघातील जनता तर मागील दहा वर्षापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहे,सोलापूर लोकसभा तर भाजपा ची प्रयोगशाळा च झाली असुन गेली दोन टर्म तेथे भाजपा नुसते “प्रयोग” च करत आहे परंतु विकास काय नाही करत आहे,जनता एकदा फसु शकते दोनदा फसु शकते पण तिसऱ्यांदा नाही,एवढे मात्र निश्चित…

अशाच काही गोष्ठी भाजपा ला उशिरा ध्यानात आल्याने त्यांना “डरना जरुरी” चे झाले आहे एवढे मात्र तितकेच खरे…

त्यातच अजुन बारामती च्या साहेबांची “तुतारी” सबंध महाराष्ट्रात तुफान गरजत आहे हे हि विसरून चालणार नाही…

क्रमशः
टिप : सदर आर्टिकल मध्ये आम्हीं फक्त सांगोला तालुक्याचे उदाहरण दिले असुन राहीलेल्या माढा,करमाळा,माळशिरस आणि मान खटाव तालुक्याच्या निकषा चे पोस्टमार्टेम आमच्या पुढील पोर्टल ला वाचा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button