महाराष्ट्र

अकलूज च्या इफ्तार पार्टीत मुस्लिम समाजाने केले भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे जंगी स्वागत…

अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर

अकलूज च्या दर्गा कमिटी ने आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीत राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील,मा सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील,मा सरपंच किशोरसिंह माने पाटील,मा जी प सदस्य सौ शितलदेवी मोहिते पाटील,मा सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील,मा पं स सदस्य फातिमा पाटावाला,ऍड हसीना शेख यांनी राजेबागस्वार दर्ग्याचे दर्शन घेत इफ्तार पार्टीत हजेरी लावली…

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आगमना वेळी मुस्लिम समाजाने जेसीबी च्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले,या वेळी धैर्यशील मोहिते पाटील,शितलदेवी मोहिते पाटील,वैष्णवीदेवी मोहिते पाटील यानी रोजा इफ्तारीसाठी आलेल्या मुस्लिम समाजातील समाज बांधवांना खजुर,फळे,थंडगार सरबत आणि पाणी वाटप केले…

इफ्तार करते वेळी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी “दुआ में याद रखो” असे म्हणताच दर्गा परिसरात जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकाच स्वरात “इंशाअल्लाह” म्हणताच एकच आनंदाचे वातावरण तयार झाले,43 माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदार संघात चालु असलेल्या दौऱ्यातुन वेळात वेळ काढत धैर्यशील मोहिते पाटील यांनी रमजान च्या पवित्र महिन्यात हक्काच्या मुस्लीम समाजाच्या इफ्तार पार्टीस लावलेली हजेरी लक्ष वेधुन घेत होती…

मोहिते पाटील आणि परिवार यांच्या सोबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेली इफ्तार पार्टी अकलूज आणि परिसरात चर्चेचा विषय ठरली…
या वेळी मुस्लिम समाज बांधवां सह हिंदु समाजातील बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती…
राजेबागस्वार दर्गा कमिटी च्या वतीने सर्वांचा स्वागत सत्कार करण्यात आला,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्गा कमिटी,मुस्लिम जमात यानी परिश्रम घेतले,इफ्तार पार्टीचे संयोजक ऍड वजीर शेख यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानत कार्यक्रमांची सांगता केली….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button