उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफतआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
देशाचा स्वातंत्र्यदिन , अमृत महोत्सव रक्षाबंधन चे औचित्य साधुन करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ, गजानन गुंजकर स्त्रीरोग तज्ञडॉ,बंडगर मॅडम, वरिष्ठ परिचारिका ढाकणे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी 17 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मोफत सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सी,डी,पी,ओ,वर्षा पाटील,सुपरवायझर सारीका सनगर यांच्या उपस्थित दहा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या याकामी परिचारिका छाया शिंदे, परिचारिका ए,एम,पठाण, आरोग्य सेविका ओव्हळ परिचारिका आर,आर,संमिदर रक्त तपासणी विभागाचे अनिकेत कोतकर, बरगे यांचे सहकार्य लाभले,यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डाॅक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, सर्व स्टाॅफ चे आभार अंगणवाडी सेविका कदीरा बेग यांनी मानले



