युवासेना सोलापूर जिल्हा विस्तारक पदी उत्तम आयवळे यांची निवड फेर निवड
करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठकारे) युवासेनेच्या जिल्हा विस्तारक पदी उत्तम सदाशिव आयवळे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शनाखी युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेना राज्य सचिव वरुण सरदेसाई यांनी आज पुनश्च नियुक्ती केली आहे.
आयवळे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाढेगांव या गावचे सुपुत्र असून अनेक वर्षांपासून ते अंबरनाथ येथे वास्तव्यास आहेत. विद्यार्थी सेने पासुन ते शिवसेनेत सक्रिय असून अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक व आरोग्य समितीवर सभापती म्हणुन काम पाहिले आहे.
प्रथमत माढा लोकसभा विस्तारक म्हणुन ते काम करत होते या कालावधीत युवासेनेची त्यांनी मजबूत बांधणी केली होती तसेच सोलापूर सिनेट सदस्य निवडणुकीत त्यांनी मुंबई ,पुणे,नाशिक च्या धर्तीवर प्रचार यंत्रणा राबवून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अॅड उषा पवार यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठावर सिनेट सदस्य निवडून आणण्याचा करिष्मा केला होता.तसेच सिनेट निवडणुकीत उमेदवार विजयी करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते.आयवळे यांच्या याच कार्याची दखल घेऊन युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे व सचिव वरुण सरदेसाई यांनी घेतली व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची विस्तारक म्हणुन जबाबदारी सोपवली होती.
सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्यानंतर मोठ्या जोमाने कामाला लागत जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात संघटनात्मक बांधणीवर भर दिला होता . शाखाप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखापर्यंत सर्वांशी त्यानी थेट संपर्क ठेवला असून प्रत्येक कार्यकर्त्यांचा कामाची ते स्वतः दखल घेतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
तात्कालिन राज्यपाल भगत कोश्यारी यांच्याकडून झालेला महापुरुषांचा अवमान , वेदांत पोस्काॅन कंपनी गुजरात ला हलवण्याचा विषय तसेच शेतकरी विद्यार्थी, युवकांच्या प्रश्नावर उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनातुन युवासेनेकडुन संपूर्ण जिल्ह्यात अक्रमकपणे आंदोलने झाली आहेत. युवासेना सदस्य नोंदणी मध्ये देखील सोलापूर जिल्ह्याने चमकदार कामगिरी केली होती. पक्षात झालेल्या बंडानंतर अंबरनाथ ,बदलापूर ,ठाणे या भागातुन अनेकांनी शिंदे यांना साथ दिली होती मात्र प्रचंड दबाव तसेच अमिषे येवून देखील आयवळे यांनी ठाकरे परिवारावर असलेली निष्ठा ढळू दिली नाही.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठांकडून उत्तम आयवळे यांना पुनश्च एकदा विस्तारक पदाची संधी दिल्याने युवासेनेकडुन या निवडीचे जोरदार स्वागत होत आहे.
जिल्हाप्रमुख सचिन बागल, बालाजी चौगूले, गणेश ईंगळे,महेश देशमुख युवतीसेना जिल्हाप्रमुख साक्षीताई भिसे,लहु गायकवाड,तुषार आवताडे,सोशल मिडिया समन्वयक विजय किर्वे,अजित स्वामी यांनी अभिनंदन केले आहे.
निवडीनंतर बोलताना नवनियुक्त जिल्हा विस्तारक उत्तम आयवळे म्हणाले कि युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे सचिव वरुण सरदेसाई यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असून संपूर्ण जिल्ह्य़ात युवासेना ताकदीने उभा करणार असल्याचे सांगीतले
करमाळा युवासेनेकडुन आयवळे यांच्या निवडीचे स्वागत
करमाळा युवासेनेकडुन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे ,जिल्हा उपप्रमुख शहरप्रमुख समीर परदेशी उपतालुकाप्रमुख पांडुरंग ढाणे युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे ,शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर आदिंनी स्वागत केले