शहर

पालघर जिल्ह्यातील सफाळे सोनावे येथे श्री साईबाबा मंदिराचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालघर तालुक्यातील सोनावे गावातील श्री साईबाबा मंदिर सोनावे घरतपाडा येथील मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनाचा सोहळा व ग्रुप डान्स स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.नवतरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून हा सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला.

वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साईबाबांची पालखी संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नरोत्तम शामराव घरत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.

ग्रुप डान्स स्पर्धेत एकूण वीस ग्रुप्सनी सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ‘मी कलाकार स्टुडिओ’ मनोर यांनी पटकावले. द्वितीय पारितोषिक ‘स्वप्निल डान्स अकॅडमी’ पालघर, तर तृतीय पारितोषिक घरतपाडा ग्रुप यांना मिळाले. चौथे पारितोषिक ‘ओम साई कला पथक’ सातपाटी यांनी पटकावले.

या सोहळ्यानिमित्त मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत पंचक्रोशीतील नव्याने रुजू झालेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड, तसेच गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मायेची शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button