शहर

संत निरंकारी मंडळातर्फे पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक आणि तांदुळवाडी येथे स्वच्छता मोहिम…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

संत निरंकारी मिशन आणि निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा संपूर्ण भारत देशात राबवले जाणारे स्वच्छ जल स्वच्छ मन ( प्रोजेक्ट अमृत) या मोहिमे अंतर्गत रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संत निरंकारी मंडळ युनिट नगावेपाडा यांच्यातर्फे विराथन बुद्रुक चाफेवाडी तलाव आणि तांदुळवाडी येथील तलावांची साफसफाई करण्यात आली

या तलावांच्या साफसफाई बरोबरच आजूबाजूच्या परिसरातील केर कचरा यांची देखील साफसफाई या मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्यातील संत निरंकारी मंडळ नगावे युनिट यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये विराथन बुद्रुक, जलसार, टेंभीखोडावे, नगावेपाडा, सफाळे, तांदुळवाडी,विश्रामपूर, दहिवाळे, सोनावे, डोंगरे,मायखोप या भागातील संत निरंकारी मंडळाचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही स्वच्छता मोहीम संत निरंकारी मंडळ युनिट नगावेपाडा मुखिया महेंद्र गवळी आणि वैभव गोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button