‘WeRmore Solution Pvt. Ltd.’ चा ६ वा वार्षिक सोहळा उत्साहात संपन्न; सौ. मानसी महेंद्र पत्याणे कंपनीच्या पहिल्या ‘करोडपती लीडर’

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
स्वप्न पाहणाऱ्यांना आणि ते पूर्ण करण्याची जिद्द ठेवणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘WeRmore Solutions Private Limited’ कंपनीचा ६ वा वर्धापन दिन सोहळा रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वाशी येथील CIDCO exhibition centre मध्ये दिमाखात पार पडला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पालघर जिल्ह्यातील विरारच्या सौ. मानसी महेंद्र पत्याणे यांचा कंपनीच्या पहिल्या ‘ करोडपती लीडर म्हणून झालेला विशेष सन्मान.
दिग्गजांची उपस्थिती आणि ५००० सभासदांचा उत्साह
या भव्य सोहळ्याला देशभरातून ५००० हून अधिक सभासद उपस्थित होते.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार संतोष जुवेकर आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. कंपनीचे (CMD) मान. श्री. विकास गोपाळ आणि (MD) सौ. मान. प्रिया कड यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.
महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श: सौ.मानसी पत्याणे
केवळ ३ वर्षांच्या अल्प कालावधीत करोडपती पदाचे शिखर सर करणाऱ्या मानसी पत्याणे यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “जगात सर्वात शक्तिशाली कोण असेल तर ती महिला आहे. महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यासाठी डायरेक्ट मार्केटिंगचे महत्त्व ओळखून स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे.” त्यांनी आपल्या यशाचे श्रेय कंपनीच्या व्यासपीठाला देतानाच आगामी काळात स्वतःसारखे अनेक लीडर्स घडवण्याचा आणि महिलांच्या प्रगतीसाठी २४ तास उपलब्ध राहण्याचा संकल्प बोलून दाखवला.

टीम विनर्सचा (Team Winners) झंझावात
या कार्यक्रमात ‘टीम विनर्स’चा मोठा सहभाग पाहायला मिळाला: टीम विनर्स मधून १५०० पेक्षा अधिक सभासद या सोहळ्याचे साक्षीदार झाले.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५० लीडर्सना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये १६० पेक्षा अधिक सभासदांनी आकर्षक बक्षिसे जिंकली.
मानसी पत्याणे यांनी आपल्या मनोगतात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी इतका सुंदर आणि भव्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल सी.एम.डी. मान.विकास गोपाळ आणि एम.डी. मान. प्रिया कड यांचे विशेष आभार मानले. या कंपनीमध्ये येणाऱ्या समाजातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आपण सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.



