वेळापूरमध्ये हजरत दावल मलीक शाह बाबा यांचा उर्स आणि संदल सोहळा उत्साहात साजरा होणार

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
वेळापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर (कोरबू वस्ती) येथे हजरत दावल मलीक शाह बाबा (रह.) यांचा वार्षिक उर्स आणि संदल सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पत्रिका आणि मिळालेल्या माहितीनुसार कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल.

जुलूस-ए-संदल मुबारक: गुरुवार, ०५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर कोरबू वस्ती ते मायनर फाटा या मार्गाने संदलचा भव्य जुलूस काढण्यात येईल.
उर्स-ए-शरीफ व लंगर: शुक्रवार, ०६ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत उर्सचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. यावेळी ‘लंगर’चे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले आहे.
इफ्तारचे आयोजन: शुक्रवारी रोजेदार भाविकांसाठी विशेष इफ्तारची सोय करण्यात आली आहे.

हा सोहळा नुरानी मस्जिद, कोरबू वस्ती (नागठाणा), वेळापूर येथे पार पडणार आहे. महफिले मिलाद आशिकाने कमिटी, दावल मलीक शाह बाबा (रह.) यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कमिटीच्या वतीने तमाम भाविकांना या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सवाब (पुण्य) पदरात पाडून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



