क्राईम

माळशिरस पंचायत समिती लाच प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’; थेट गटविकास अधिकाऱ्यांचे नाव फिर्यादीत!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​माळशिरस:माळशिरस पंचायत समितीतील लाच प्रकरणाने आता प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अटकेत असलेला आरोपी सुंदरराव नागटिळक याने स्वतःसोबतच गटविकास अधिकारी (BDO) पांढरे यांच्यासाठीही ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता या तपासाची सुई थेट बड्या अधिकाऱ्यांकडे वळल्याने “पांढरे यांच्यावर कारवाई होणार का?” याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​काय आहे नेमके प्रकरण?

​लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सुंदरराव उत्तम नागटिळक याला रंगेहाथ पकडले होते. मात्र, पोलीस फिर्यादीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, नागटिळक याने तक्रारदाराकडे एकूण १० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी: ​५,००० रुपये: स्वतःसाठी म्हणजे (सुंदरराव नागटिळक) यांच्यासाठी तर ५,००० रुपये: गटविकास अधिकारी पांढरे यांच्यासाठी स्वतःच्या नावाचा उल्लेख टाळून बड्या अधिकाऱ्याच्या नावाचा वापर केल्याने किंवा या व्यवहारात वरिष्ठांचा सहभाग असण्याच्या शक्यतेने या प्रकरणाला आता ‘नवा ट्विस्ट’ मिळाला आहे

​सध्या पंचायत समितीवर लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासक नियुक्त आहेत. सभापती आणि उपसभापतींची पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, अशी भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासक काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे.​प्रशासक राजवटीत भ्रष्टाचाराचा कळस?झाल्याचे पाहाव्यास मिळते

फिर्यादीत नाव आल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता बीडिओ पांढरे यांची चौकशी करणार का, हा कळीचा मुद्दा ठरला आहे.माळशिरस पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या फिर्यादीनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणामुळे पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

​थोडक्यात सांगायचे तर: लाचखोर नागटिळक याने बीडिओंचे नाव घेतल्यामुळे आता हे प्रकरण केवळ एका कर्मचाऱ्यापुरते मर्यादित न राहता थेट वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button