पालघर दुहेरी हत्याकांड दिरानेच केला भावजयी आणि दोन वर्षीय पुतणीचा खून
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640
पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्गम भाग असलेल्या सावरे ग्रामपंचायत हद्दीतील बर्डे पाड्यालगतच्या डोंगरालगत असलेल्या एका ओढ्यात एक महिला आणि तिच्या 2 वर्षीय मुलीचा मृतदेह हातपाय बांधून दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
या दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संदीप डावरे याला अटक केली आहे..जागेच्या वादातून त्याने भावजयी आणि पुतणीचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सावरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुस्मिता प्रवीण डावरे वय वर्ष ( 28) ही तरुणी व तिची 2 वर्षाची मुलगी पतीसोबत राहत होती. पती मच्छीमार बोटीवर काम करत असल्याने तो मच्छीमारीसाठी बाहेर गेल्याने संदीपने डाव साधून हे कृत्य केले आहे .
प्रवीण आणि त्याची पत्नी सुस्मिताने जागा खाली करून दुसरीकडे जावे असा तगादा संदीपने त्यांच्या मागे लावला होता. परंतु त्याला ते तयार नव्हते. सुस्मिता संदीपला जशास तसे उत्तर देत होती. त्यामुळे सुडाने पेटलेल्या संदीपने या दोघींचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून करून एका मागून एक दोघींना खांद्यावर उचलून त्यांचे मृतदेह घरापासून चार किलोमीटरवरच्या जंगलात नेऊन हातपाय बांधून दगडाला बांधून नाल्यात फेकून दिले होते .
याप्रकरणी मनोर पोलिसांनी संदीपची कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याबाबत कबुली जबाब दिल्यावर मनोर पोलीस ठाण्यात संदीपच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.