केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 बाबत सकल मुस्लिम समाज करमाळा यांनी दिले खासदार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
केंद्र सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा विधेयक 2024 संसदेत मांडण्यात आला होता श्री जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीसी ने वक्फ दुरुस्ती विषयक सुचना मागविण्यात आल्या आहेत त्या संदर्भात सकल मुस्लीम समाज करमाळा तालुका यांच्या वतीने आज माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील ( भैय्यासाहेब ) मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांना सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने हे विधेयक मुस्लीम समाजाला कसे मारक त्यांच्या हक्काची कसे पायमल्ली होणार आहे यामुळे समाजाचे नुकसान होऊन त्यांना वक्फ च्या आधिकारातुन डावलण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन देऊन विधेयकात दुरुस्ती विषयक विविध सुचना अॅड असीम जहागिरदार यांनी केल्या आहेत.
या विधेयकात मुस्लीम समाजातील मालमत्तेत हस्तक्षेप करणारे असुन मुस्लीम समाजाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून निर्णय घेतला आहे भविष्यात या मालमत्ता नष्ट करण्याचा धोका यातुन दिसत आहे.
यावेळी खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील साहेब यांनी सकल मुस्लीम समाजातील लोकांनी या विधेयका संदर्भात ज्या काही सुचना केल्या आहेत व दुरुस्ती सुचविलेल्या आहेत त्या सर्व जेपीसी च्या कमिटीतील खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे साहेब यांना पाठविण्यात येणार आहे
व आम्ही स्वतः या संदर्भात केंद्र सरकार कडे पाठपुरावा करु असे आश्वासन दिले आहे.तसेच करमाळा शहरातील व तालुक्यातील मुस्लीम समाजातील असणारे विविध प्रश्नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे
यावेळी सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहर अध्यक्ष जमीर भाई सय्यद.आजाद भाई शेख ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा शरद पवार गट) .मिनहाज भाई जाहागीरदार.मुबीन भाई जाहागीरदार.ॲडव्होकेट असीम जाहागीरदार.अलीम भाई खान( सामाजिक कार्यकर्ते).शाहिद भाई बेग( युवक नेते) हशमोद्दीन भाई तांबोळी.मतीन भाई हवलदार अब्दुल भाई पठाण उपस्थित होते.