नितेश राणे यांना महाराष्ट्रात नेमकं घडवायचं काय आहे…? महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचं व्हिजन तरी नितेश राणे यांनी सांगावं…?
प्रतिनिधी :- आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अहिल्यानगर,धाराशिव,सोलापूर,सातारा,सांगली आणि पुणे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपा कुठे आहे की नाही असे म्हणण्याची वेळ आली असताना सुध्दा नितेश राणे हे सध्याच्या घडीला पुरोगामी महाराष्ट्राला “अशांत” करण्याचे काम करत आहेत…
बहुतेक भाजपा संपवायची सुपारी राणे यांनी घेतली की काय अशी शंका देखील कधी कधी उपस्थित होते,विशिष्ठ अशा एका समाजाला “उकसावून” नितेश राणे यांना वाटत असेल की,मी भाजपा चा आगामी एल के अडवाणी होईल तर नितेश राणे हे बालिश बुद्धी चे आहेत असे समजायला काय हरकत आहे…
कारण अटल बिहारी वाजपेयी आणि एल के अडवाणी यांच्या काळातील भाजपा खरोखर आशावादी होती,सत्तेच्या माध्यमातून सुध्दा या नेत्यांनी कधी मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह टिका टिपण्णी केली नव्हती,ते निवडणुकी पुरते राजकारण करत होते आणि नंतर च्या वेळेत सामाजिक सलोखा हि राखत होते…
नितेश राणे यांना मुस्लिम समाजावर गरळ ओकून काय मिळणार आहे…? उलट ज्या ज्या जिल्ह्यात जाऊन नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले आहे तिथली परिस्थिती जरा पहा,मुस्लिम समाजासह प्रत्येक समाजातील घटक हा नितेश राणे यांच्या वर नाराज असुन नितेश राणे स्वतः त्यांची प्रतिमा खराब करुन घेत आहेत…
नितेश राणे यांना जर असे वाटत असेल की,येणाऱ्या विधानसभा निवडणुकी च्या पार्श्व भूमीवर मुस्लिम समाजाला “उकसावून” जातीय दंगली झाल्या तर याचा फायदा भाजपा ला होईल असे जर नितेश राणे यांना स्वप्न पडत असतील तर त्यांचे हे स्वप्न दिवा स्वप्न ठरेल हे मात्र तितकेच खरे…
“युगपुरुष” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या विषयी तर नितेश राणे एक चकार शब्द हि बोलत नाहीत,तो “आपटे” कुठे नेऊन ठेवला आहे हे राणे यांनी महाराष्ट्राला अगोदर सांगावे…
कोकणातील त्या घटनेला “डायव्हर्ट” करण्यासाठी आणि जनतेला वेड्यात काढण्यासाठी नितेश राणे जर हे काम करत असतील तर त्यांच्यासाठी हि बाब अतिशय लाजिरवाणी आहे असे समजावे का…?
परंतु नितेश राणे किंवा त्यांची भाजपा जसे समजता तसे होऊ शकत नाही कारण सरळ सरळ आपण लोकांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनवते वेळी भ्रष्टाचार केला आहे तो दिसतोच आहे,असे महाराष्ट्रातील विरोधक हि सांगत आहेत ना…
या मुळे या सरकारला आणि नितेश राणे यांना महाराष्ट्राची जनता कदापि आणि कधीही माफ करणार नाही हे मात्र तितकेच खरे…