पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत विराथन बुद्रुक चाफेवाडी गावात नवीन रस्त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी गावात सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवारी संध्याकाळी पार पडला
यावेळी उपस्थित चाफेवाडी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच विराथन बुद्रुक ग्रामपंचायत माजी सदस्य रामचंद्र चौधरी आणि विद्यमान सदस्य शशिकांत घरत यांच्या हस्ते या नवीन रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले

यावेळी विराथन बुद्रुक ग्रामपंचायत विद्यमान सदस्य ॲडव्होकेट कुमारी आकांक्षा भोईर, कोमल कारभारी, पत्रकार विजय घरत, आणि ग्रामस्थ तेजस पाटील, धैर्य घरत, राजेंद्र घरत, अशोक किणी, महेंद्र किणी, नंदकुमार पाटील, महेंद्र किणी, भुपेश पाटील, श्रीमती काशीबाई काशिनाथ भोईर, सरिता घरत,मेघा घरत, कुंदा किणी, योगिता किणी, बबीता चौधरी, अक्षता घरत, अमिता घरत,सोनल पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हा रस्ता बुलेट ट्रेन व एल अँड टी कंपनी तसेच विराथन बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत यांच्या निधीतून करण्यात येणार आहे.
हा रस्ता दशरथ घरत यांच्या घरापासून ते माजी ग्रामपंचायत महिला सदस्य दमयंती पाटील यांच्या घरापर्यंत करण्यात येणार आहे.



