मुंबई गिरगाव येथून आलेल्या (16) वर्षीय अल्पवयीन भाचीने सफाळे केळवा-रावळे गावात घेतला गळफास
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी
विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील एका (16) वर्षीय अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे ही घटना शुक्रवारी दुपारी सफाळे-केळवा रावळे पाडा गावात घडली आहे. नेहा दिनेश बीडबिडीया वय वर्ष (16) मूळची राहणारी मुंबई गिरगाव पण ती दोन दिवसा आधी तिच्या केळवा रावळे पाडा येथील मामाच्या घरी आई-वडिलांसह पाहुणी म्हणून राहण्यासाठी आली होती. गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी तिचे आई-वडील मुंबई येथे आपल्या घरी गेल्यावर नेहा तिच्या मामाकडे होती. शुक्रवार दिनांक 01 मार्च 2024 रोजी दुपारी तिने आपल्या मामाच्या घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येबाबत सफाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील करत आहेत.