भाजपा पक्षाच्या वरिष्ठ निवडणूक मंडळाने स्वतः ची शक्ती वापरून पक्षा अंतर्गत दुफळी चां बीमोड करावा ,,,,!
अकलूज प्रतिनिधी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न 9960178213
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून मा भागवत जी कराड साहेब व आ प्रसाद जी लाड साहेब यांनी टेंभुर्णी येथे इच्छुकांच्या मुलाखती आणि पक्ष पदाधिकारी यांच्या मुलाखती घेऊन मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला .हा करण्या पूर्वी ते पंढरपूर येथे भाजपा चे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांना ही भेटले व त्यांचा सत्कार ही त्यांनी स्वीकारला .इथेच माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे पारंपारिक राजकीय शत्रू उत्तम राव जानकर यांची ही त्यांनी भेट घडवून आणली आणि राष्ट्रवादीचे नेते असा परिचय करून दिला .करमाळा येथील रश्मी ताई बागल कोलते यांनी देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष प्रवेश केला , त्या पक्ष प्रवेशाचे श्रेय विद्यमान खा , रणजित सिंह निंबाळकर यांना देऊन फडणवीस साहेब यांनी त्याच दिवशी तत्काळ रश्मी ताई बागल कोलते यांना महाराष्ट्र उपाध्यक्ष पद बहाल केले .दस्तुर खुद्द माळशिरस तालुक्यात आणि अकलूज शहरात ही पक्षा कडून पदाधिकारी नियुक्त्या झाल्या त्या मोहिते पाटील यांच्या शिफारशी शिवाय अस्तित्वात आलेल्या आहेत पक्ष म्हणून स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न हा स्तुत्य असला तरी ही त्या भागातील नेतृत्वाला मर्यादित शक्तित रोखून धरण्याची ही ती कृती असते , कमी शक्तीच्या गट पातळीवर प्रभाव असणाऱ्या मंडळींना हाताशी धरून तिकीट वाटप कशा प्रकारे केले जाते हे आपण महाळूंग नगर पालिका क्षेत्रात पाहिले आहे . माढा लोकसभा मतदार संघात सकृत दर्शनी पाहिले तरी हेच दिसते की , मोहिते पाटील विरोधकांची सर्व फळी ही भाजपा मध्ये सक्रिय आहे , आणि दुसऱ्या बाजूने मोहिते पाटील यांचे समर्थन करणारी बहुतेक राजकीय मंडळी ही भाजपा किंवा भाजपा मित्र पक्षाच्या गोटा बाहेर स्थिरावलेली आहेत , ते मोहिते पाटील यांना निवडणुकीत थेट मदत तेंव्हाच करतील जेंव्हा मोहिते पाटील यांची अपक्ष किंवा भाजपा व्यतरिक्त उमेदवारी असेल तेंव्हा प्रश्न हा निर्माण होतो की जर भाजपा ला पक्ष म्हणून एक संघता हवी असेल तर पक्ष शिस्त म्हणून कांहीं निर्णय घ्यावे लागतील .ज्या मतदार संघातून विजयसिंह जी मोहिते पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते , त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून ते भाजपा मध्ये आले , त्यांच्या नंतर पक्षात आलेले रणजितसिंह निंबाळकर हे साधे काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष होते फलटण मतदार संघात त्यांची स्वतः ची शक्ती ही तितकी मजबूत नव्हती .अश्या व्यक्तीला उमेदवार भाजपा ने बनवले , त्यांना जागा मोकळी करून देताना मोहिते पाटील यांनी क्षणाचा ही विलंब न लावता ती जागा देऊ केली आणि आपल्या तालुक्या सह जिथे ही त्यांचे समर्थक आहेत अश्या सर्वांना भाजपला मतदान करण्यास भाग पाडले , रणजितसिंह निंबाळकर यांचे समर्थक कोण आहेत ? त्यांचे आणि आपले जमते की नाही याचा साधा विचार ही त्यांनी मनात आणला नाही दिलेला शब्द पूर्ण ताकदी ने अंमलात आणून त्यांनी जगाला दर्शवून दिले की समर्पण म्हणजे नक्की काय असते ? पण याची किंमत दुर्दैवाने ज्यांनी पदरात दान घेतले त्यांना राहिली नाही उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधासभा राखीव चे तिकीट भाजप ने नाकारल्या नंतर कोणताही मुलाहिजा न ठेवता भाजपा चां त्याग करत एक संघ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वीकार केला , मोहिते पाटील आणि ना अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष 2006साली करमाळा येथे सुरू झाला , विलास राव घुमरे यांनी अजित दादा कडे धाव घेतली आणि “मैं हू ना” हा शब्द प्रयोग जिल्हा राजकारणात ऐकू आला ,तिथून सुरू झालेला संघर्ष थेट पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघा चे विधानसभा निवडणुकी पर्यंत ताणला गेला , आणि एक कायमची विभाजनाची दरी मोहिते पाटील व इतर समूहात निर्माण झाली , समविचारी या गोंडस नावाखाली हा गट राजकारणात सक्रिय राहिला , त्या समविचारी गटाची कोणती वैचारिक धारा होती ? त्याचे अधिष्ठान काय होते? तर फक्त मोहिते पाटील नको , ते सोडून आम्हाला कोणीही चालतील , समविचारी नावाची जी मोट बांधली होती त्यात संजय मामा शिंदे केंद्रस्थानी होते , तर प्रशांत परिचारक हे या गटाचे समन्वयक होते उत्तमराव जानकर हे मोहिते पाटील गटाचे राजकीय शत्रू म्हणून समविचारी गटाने त्यांना जवळ केले , आर्थिक आणि राजकीय शक्ती त्यांचे कडून पुरवली गेली , पण लोकसभा निवडणुकीत त्याच समविचारी चे संजय मामा उभे राहिल्यानंतर उत्तमराव जानकर थेट त्यांचे विरोधात गेले , हीच स्थिती बागल गटाने करमाळा विधानसभेत केली , थेट संजय मामा शिंदे यांचे विरोधात शिवसेना पक्षाचे तिकीट रश्मीताई बागल यांनी आणले सूक्ष्म विचार केला तर या संघर्षात पडद्या आडून भाजपा विरोधी महा आघाडी कार्यरत होती मोहिते पाटील यांच्या जवळचे म्हणून नारायण आबा पाटील यांची उमेदवारी डावलली गेली , तर दीपक आबा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेचे शहाजी बापू यांना समर्थन दिले.105आमदार येऊन ही भाजपा सत्तेबाहेर ठेवण्यात ही आघाडी सहाय्यभूत ठरली , सत्ता वंचित झाल्याने मोहिते पाटील यांच्या मतदार संघाचा विकास रोडवला , पण तोच निधी उत्तमराव जानकर यांनी जिल्हा विकास नियोजन मंडळाचे सदस्य बनून त्यांच्या गटासाठी आणू शकले .परिस्थिती जन्य बदल स्वीकारून भूमिका स्वीकारणारे संसदीय राजकारणात यशाच्या पायऱ्या चढताना दिसत होते , तर समग्र भाजपा सहित मोहिते पाटील ही सत्ता वंचित बनले होते पण त्यांनी निष्ठेचा त्याग केला नाही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची शकले उडाली , आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या भुमीके तून अजित दादा महायुतीत आले , आपले शत्रुत्व विसरून आ रणजित सिंह मोहिते पाटील साहेब यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले , सत्तेचा आर्थिक व राजकीय लाभ उठवण्या साठी उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाकडे गेले हे वास्तव आहे , त्याचा धागा पकडुन त्यांनी दावा केला की माझा डी एन ए भाजपचा आहे मग अखंड राष्ट्रवादी चां डी एन ए भाजपा चां होता काय? कुणी किती ही निष्ठेचा सोनेरी मुलामा दिला तरी सत्ता व अर्थ प्राप्ती च्या हेतूचे पितळ लपून राहत नाही ,अश्या समूहाचे खरे मानून भाजपमय झालेल्या मोहिते पाटील यांना डावलण्याची भूमिका भाजपने घेणे उचित ठरणार नाही.जो मनाचा मोठेपणा मोहिते पाटील यांनी दर्शवून कोणतीही खळखळ कींतू परंतु मनात न ठेवता पक्षासाठी खासदारकीचा त्याग क्षणार्धात केला , त्याची जाण ठेऊन आत्ता धैर्यशील जी मोहिते पाटील साहेब यांना भाजपचे तिकीट दिलेच पाहिजे आणि तालुका निहाय शक्ती असलेल्या समूहाला आणि मित्र पक्षाचे नेत्यांना भाजप ने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश ही दिले पाहिजेत , तरच ही पक्षांतर्गत दुफळी आणि गट बाजीचे राजकारण थांबेल , व सशक्त भाजपा म्हणून पक्षाची प्रतिमा मतदारा समोर जाईल .लक्षात ठेवा की अंतर्गत बंडाळी ने पोखरलेला कोणताही पक्ष कोणत्याही निवडणुकीत दमदार भूमिका निभावू शकत नाही मोदी जी नी महत प्रयासाने उंचीवर नेऊन ठेवलेल्या पक्षाची वाताहत माकड खेळा मुळे होऊ नये , हे सांगणे आमच्या सारख्याचे काम आहे”निंबाचीया झाडा साखरेचे आळे! आपुली ती फळे न संडीच !!तैसे अधमाचे अमंगल चित्त !वमन ते हित करुनी सांडी!!लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले तरी निबोळया गोड होत नाहीत तसे अमंगल दुर्जन माणसांचे लक्षण असते , त्यांच्या हिताचे असलेले दूध ही ते ओकारी काढून सांडून टाकतील अश्या दुर्जन व टवाळखोर समूहाच्या नादाला लागून पक्षाचे खोबरे करायचे की सुसंस्कृत जबाबदारीचे राजकारण करून पक्षाला स्थैर्य आणि प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची याचा विवेकी निर्णय भाजपा श्रेष्ठी घेतील ह्या आशा आपण करुयात ,,,,,,तूर्त इतकेच,,,,,,,,!