Uncategorizedशहर

वारी शिक्षणाची…. वारी साक्षरतेची…..

अकलूज प्रतिनिधी -तात्यासाहेब काटकर

गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका…..असे म्हणत सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या शाळेने नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वारी साक्षरतेची काढली. पालखी मार्गावर ‘आई मला शाळेत जायचंय’ ‘साक्षरता पालखी, वेगवेगळ्या अभंगाने रांगोळी व पोष्टर रेखाटली होती… वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विठू नामाचा गजर…

अशा विठ्ठलमय वातावरणात नवभारत साक्षरता अभियान पार पडले. साक्षरता पालखीत हजारो वारकरी व लोकांना साक्षरतेचे महत्व सांगितले.‘शिक्षण, हे आयुष्याचे सार, नवभारत साक्षरता कार्यक्रम हे सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार, शिक्षणाची वारी, सर्वांसाठी शिक्षण – स्वावलंबनाचा मार्ग,‘सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी विकास, शिक्षण घेऊन प्रगती करा, सर्वांसाठी शिक्षण हाच समृद्ध आणि आनंदी जीवनाचा पाया, अक्षरं शिकूया जग बदलूया, शिक्षण घेऊन स्वावलंबी बना असे घोषफलक घेऊन विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

अशा या साक्षरता दिंडी चे स्वागत उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, केंद्रप्रमुख श्री जाधव सर, नवभारत साक्षरता अभियानाचे प्रमुख रावसाहेब मगर, तानाजी महाडिक यांनी केले. जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोबत आलेल्या हजारो वारकरी, व लोकांना साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यालयाने एक पथनाट्य सादर करून एनसीसी व एन एस एस चे विद्यार्थी यांनी वारीमध्ये असणाऱ्या लोकांना साक्षरतेचे महत्व पटवून दिले. वारकऱ्यांनीही नवभारत साक्षरता दिंडीमध्ये सहभागी होऊन साक्षरते विषयी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या साक्षरता अभियानाच्या कार्यक्रमासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची नवभारत साक्षरता दिंडी व दिंडीचे स्वयंसेवक रमेश कवितके व लव गायकवाड यांनी शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button