शहर

करमाळा विधानसभा मतदारसंघातील पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा विधानसभा मतदार संघातील सर्व पुरोगामी विचारांच्या सहकाऱ्यांची नुकतीच केमिस्ट भवन करमाळा येथे नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीचे आयोजन डॉ सुजित शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केली होती.

या बैठकीत करमाळा विधानसभा निवडणुकीत सर्व पुरोगामी विचारांच्या सहकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका घ्यावी यावर विचार विमर्श करण्यात आला. यामध्ये भारत मुक्ती मोर्चाचे मा. गजानन ननवरे(बाबा), बहूजन संघर्षचे मा. राजाभाऊ कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मा. सचिन जगताप, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. संजय गुठाळ, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव मा. अंगद देवकाते, ग्राहक पंचायतीचे मा. संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुहास ओहोळ, संभाजी ब्रिगेडचे गणेश कुकडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष माने, मेरगळ, काझी तसेच पत्रकार अलिमभाई, अशपाक सय्यद व ज्ञानदेव काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button