अकलूज: भीषण अपघातात तरुण उद्योजक अरबाज तांबोळी यांचे निधन,तांबोळी परिवारावर शोककळा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज: येथील तांबोळी परिवारातील तरुण आणि मनमिळावू व्यक्तिमत्व अरबाज नजीर तांबोळी यांचे नुकतेच भीषण अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या जाण्याने अकलूज परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तांबोळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज तांबोळी यांचा अपघात अत्यंत दुर्दैवी ठरला. अपघाताची बातमी समजताच मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. अरबाज हे त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वपरिचित होते.

अरबाज यांच्या पश्चात त्यांचे वडील नजीर गुलाब तांबोळी, आई जरीना नजीर तांबोळी आणि विवाहित बहीण महेक अल्ताफ तांबोळी असा मोठा परिवार आहे. घराचा आधार असलेला तरुण मुलगा गेल्याने तांबोळी कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
परिसरातील नागरिक, व्यापारी आणि मित्रपरिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
”तरुण वयात काळाने घाला घातल्यामुळे एका उमद्या तरुणाला आम्ही मुकलो आहोत. टाइम्स 9 न्यूज समूहाच्या वतीने ईश्वर अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो त्यांना जन्नत नशीब करो आणि तांबोळी परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.”



