दुर्घटना

सफाळे विटीलाईन माकणे रस्त्यावरील अपघातात डहाणू येथील 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पालघर जिल्हा

प्रतिनिधी विजय घरत

भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

सफाळे विटी लाईन रस्त्यावरील माकणे गावाजवळ समोरून येणाऱ्या आयवा ट्रकने मोटरसायकलला समोरून ठोकर दिल्यामुळे या अपघातात डहाणू येथील (35) वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सफाळे पोलिसांनी पळून गेलेल्या आयवा ट्रक चालकाला त्वरित अटक करून त्याच्या विरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

आहे.मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सफाळे विटी लाईन रस्त्यावरून माकणे या दिशेने MH-O4-LY-7875 या क्रमांकाचा आयवा ट्रक घेऊन ट्रक चालक विकास गुंडेराव केंद्रे मूळचा राहणारा घोडबंदर ठाणे हा भरधाव वेगाने जात असताना

समोरून येणाऱ्या MH-48-AU-0915 या ॲक्टिव्हा मोटरसायकलला त्याने माकणे रोडवरील माऊली ॲक्वा दुकानासमोर ठोकर दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील चालक हरेश अर्जुन कुरकुटे वय वर्ष (35) राहणार डहाणू याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पळून जाणाऱ्या आयवा ट्रक चालकाला सफाळे पोलिसांनी त्वरित अटक करून त्यांच्याविरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button