प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर-२०२४ उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न….
प्रतिनिधी राहुल गायकवाड
प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज यांच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे त्यांना राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे खेळाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.जयसिंह मोहिते-पाटील व अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज परिसरातील शालेय खेळाडूंसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव, संचालक यशवंत माने देशमुख, भीमाशंकर पाटील, शिबीर प्रमुख खंडाप्पा कोरे, अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
हे उन्हाळी क्रीडा शिबीर दि. १३ ते १७ एप्रिल २०२४ या कालावधीत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, शंकरनगर-अकलूज येथे सकाळी ७.०० ते १०.०० यावेळेत घेण्यात आले. यामध्ये वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी या खेळांचे प्रशिक्षण उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक यशवंत माने देशमुख, खंडाप्पा कोरे, अनिल मोहिते, बनसोडे ए. व्ही, माने देशमुख डी. बी, कोकाटे डी.ए, चव्हाण एस.व्ही, सय्यद डी. ए, शिंदे टी.वाय, साळुंखे ए.डी, राऊत एस डी, पाटील बी.बी,भिंगे यु.एम, लोंढे आर.एस, वाघमोडे एच.पी, पांढरे पी.एस, बनजगोळकर एन.डी, पाटील एस.एस. यांनी दिले.
या शिबिरामध्ये एकूण २२१ खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये क्रीडा प्रकारानुसार अथलेटिक्स-९३ मुले, ४१ मुली एकूण १३४, हॉलिबॉल २२ मुले, वेटलिफ्टिंग ४७ मुले, कबड्डी ११ मुले, ७ मुली एकूण १८ इ. खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण शिबिरात वेटलिफ्टिंग, हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, कबड्डी या खेळ प्रकारातील प्रत्येकी पाच उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षण बक्षिसे व सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच दररोज खाऊचे वाटप करण्यात आले. प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या खेळाडूंनी व पालकांनी प्रशिक्षण दर्जेदार मिळाल्याची भावना व्यक्त केली.