महाराष्ट्र

बागल गटाचे कट्टर समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी जगताप आता करणार तुतारीचा प्रचार,,,भाजपाच्या हुकुमशाही धोरणा विरोधात मतदान करण्याचे केले आवाहन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

बागल गटाचे कट्टर समर्थक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप हे राष्ट्रीय नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारीचा प्रचार करणार असून तालुक्यातील एकूण 118 गावांमध्ये तुतारीचा प्रचार करणार असल्याचे श्री जगताप यांनी बोलताना सांगितले माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी करमाळा तालुक्यात स्वतंत्र, समांतर यंत्रणा राबवणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिली आहे.

माजी उपसभापती जगताप म्हणाले, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) यांच्यासह मित्र पक्षातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करमाळा तालुक्यातील ११८ गावे व वाड्या वस्त्यापर्यंत पोहचून भाजपच्या हुकूमशाही धोरणाविराधात व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहे.

महाविकास आघाडी व मित्र पक्ष यांना सोबत घेऊन तालुक्यातील सामाजिक संघटना, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कार्यकारी सेवा संस्था, महिला बचत गट, वाचनालय संस्था, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, अशा सर्व संस्था व संघटने पदाधिकारी व सभासदांना भेटून मोहिते- पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहोत. ही प्रचार यंत्रणा उभी करण्याचा हेतू हा भाजपाच्या चुकीच्या धोरणासाठी आहे, असेही ते म्हणाले आहेत. या लोकसभा निवडणुकीपुरतीच ही व्हूवरचना असल्याचे त्यांनी सांगितले.

माढासह सोलापूर जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेनुसार किमान 42 हजार लोक करमाळा तालुक्याशी निगडित आहेत की ज्यांचा रोटी बेटीचा व्यवहार झालेला आहे. या सर्व 42 हजार मतदारांचे नाव, मोबाईल नंबर आमच्याकडे असून त्यांना समक्ष भेटून प्रणिती शिंदे यांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहोत. त्याच पद्धतीने धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये किमान 22 हजार लोक असे आहेत की त्यांचाही रोटी-बेटीचा व्यवहार करमाळा तालुक्याची निगडित आहे, अशा सर्व मतदारांनाही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करण्याचे आवाहन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button