पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केली कारवाई
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील कॅम्लीन नाक्याजवळ असलेल्या एका बोर्डिंग लॉजवर एमआयडीसी बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी छापा टाकून महिलांकडून देह विक्री करून घेणाऱ्या तीन जणांविरुद्ध कारवाई करून तीन महिलांची सुटका केली आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कॅम्लीन नाक्याजवळ असलेल्या बोर्डिंग अँड लॉजवर डान्सबारच्या नावावर वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी या भागातील सामाजिक संस्थांनी बोईसर एमआयडीसी पोलिसांना केल्या होत्या. यावर त्वरित अंमलबजावणी करत बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी आपल्या पथकासह मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी बोईसर एमआयडीसी क्षेत्रातील कॅम्लीन नाक्याजवळ असलेल्या बोर्डिंग अँड लॉजवर छापा टाकून देह विक्री करून घेणाऱ्या व देव विक्री करणाऱ्या तीन महिला सह तीन पुरुषांना ताब्यात घेऊन देह विक्री करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन इसमाविरुद्ध बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या पथकाने केली आहे.