दुर्घटना
पालघर जिल्ह्यातील सफाळे जलसार येथील तरुणाचा रेल्वे क्रॉस करताना अपघात होऊन जागीच मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील जलसार ग्रामपंचायत हद्दीतील एका अविवाहित तरुणाचा रेल्वे क्रॉस करताना रविवारी दुपारी जागीच मृत्यू झाला आहे.
सफाळे जलसार ग्रामपंचायत हद्दीतील जुना गाव जलसार येथील ( 34 )वर्षीय तरुण विजय बळीराम भोईर हा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सफाळे पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एक क्रॉस करून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर जात असताना डहाणू दिशेने विरार कडे जाणाऱ्या रेल्वे लोकल खाली या तरुणाचा अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.



