पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून ही स्मशानभूमी पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे सध्या ही स्मशानभूमी पडण्याच्या मार्गावर आली आहे.
पावसाळ्यापूर्वी भर उन्हाळ्यात टेंभीखोडावे ग्रामपंचायत हद्दीच्या पश्चिमेला असलेल्या स्मशानभूमीचे छत उडून गेल्यामुळे पावसाच्या पाण्याने या स्मशानभूमीची लोखंडी शेड संपूर्णपणे गंजली आहे.तर भिंतीवर पाणी पडल्यामुळे या भिंतींना भेगा जाऊन या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आल्या आहेत.यामुळे या गावातील लोकांना अंत्यविधी करताना नाहक त्रास सहन करावा लागतो

याबाबत टेंभीखोडावे सरपंच सौ. शोभा कमलाकर पाटील आणि उपसरपंच धणेश गावड यांनी 2024 रोजी पालघर पंचायत समितीला पत्र लिहून आणि प्रत्यक्ष भेट देऊन नवीन स्मशानभूमीची मागणी केली असताना पंचायत समितीकडे नवीन स्मशानभूमी उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आल्यामुळे सध्या या गावातील नागरिकांना मयत व्यक्तीचा अंत्यविधी चक्क भर पावसात उभे राहून करावा लागत आहे यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत



