खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मुलाखत आणि संपादक नौशाद मुलाणी यांनी दिलेले प्रोत्साहन बळ देणारेच ठरले…

🎯 संविधानिक पदावर असलेल्या आपल्या माणसाची आमीर मोहोळकर यांनी घेतलेली पहिली मुलाखत…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
साप्ताहिक “आधारस्तंभ” च्या माध्यमातून प्रिंट मिडियाचा अनुभव पाठीशी तर होताच परंतु माझे दिवंगत वडील ज्येष्ठ रंगकर्मी युसुफ मोहोळकर यांच्या निधनानंतर प्रिंट मिडिया मध्ये काम करणे जवळ जवळ बंदच केले होते…
मला आठवतंय दोन वर्षांपूर्वी गणेश उत्सवा प्रसंगी माझी आणि नौशाद मुलाणी जे टाइम्स 9 चे संपादक म्हणून कार्यरत आहेत त्यांची गाठ पडली आणि प्रिंट मिडियाचा अनुभव पाठीशी असल्या कारणाने त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये प्रवेश करा अशी गळ घातली…
काल परवा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्याचे पदाधिकारी असलेले मोहसीनभाई शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देणार असल्याचे कळले आणि नौशाद मुलाणी यांनी आज खासदार साहेबांची मुलाखत “आमीर तूच घे असे” सांगितले…
आपलाच माणूस असलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांची मुलाखत घेण्याचे दडपण माझ्यावर होतेच परंतु संविधानिक पदावर असलेल्या एवढ्या मोठ्या माणसाची मुलाखत माझ्या कडून कशी होईल याचे टेन्शन जास्त होते,अशातच मला खऱ्या अर्थाने बळ द्यायचे काम कुणी केले असेल तर ते नौशाद मुलाणी यांनी…

आज देशाच्या संसद भवनात आपल्या माढा लोकसभा मतदार संघाची बाजू नेटाने लढणाऱ्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माझ्या हाता मध्ये इलेक्ट्रॉनिक मिडियाचा बूम पाहताच “अरे…! तु पण पत्रकार झालास का…?” असा प्रश्न उपस्थित करताच अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या चळवळीतील अग्रगण्य कार्यकर्ते जावेद (बाबा) तांबोळी यांनी लोकसभा निवडणुकीत टाइम्स 9 च्या माध्यमातून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे फुटेजच खासदार साहेबांच्या हाती ठेवले…
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मुलाखत घेण्या अगोदर माझ्या कडून प्रश्नांची तयारी तर काहीच नव्हती तरी सुद्धा चालू घडामोडी आणि सामाजिक प्रश्नांची उकल करत प्रश्न विचारले खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील मला तितकाच प्रतिसाद देत प्रश्नांची उत्तरे दिली आणि माझ्या मनातील एक स्वप्नवत मुलाखत माझ्या हातून पार पडली…
या सर्व घडामोडी मध्ये संपादक म्हणून नौशाद मुलाणी यांनी मला जी ताकद दिली एक विश्वास दिला तो खरंच वाखाणण्याजोगा होता आणि आहे,या साठी मी नौशाद मुलाणी यांचे किती कौतुक करावे आणि किती आभार मानावे,कसे मानावे हे अजूनही मला कळेना असे झाले आहे…
टाइम्स 9 न्यूज ने अकलूज परिसरात नौशाद मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच जनतेच्याच प्रश्नांची बाजू “निर्भिडपणे” मांडली असून इथून पुढे हि टाइम्स 9 न्यूज परिवार म्हणून त्या मुव्हमेंटला मी सुद्धा पाईक असणार आहे हे मात्र तितकेच खरे,शेवटी नौशाद मुलाणी यांचे आभार मानतो आणि येथेच थांबतो…



