मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त अकलूज शहर मुस्लिम समाजाची बैठक संपन्न…

🎯 बैठकीला अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज,दिनांक 27 ऑगस्ट 2025 मुस्लीम समाजाच्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक जामा मशीद,बागवान गल्ली येथे आयोजित करण्यात आली होती,
या बैठकीत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या प्रसंगी कार्यक्रमाची तयारी,सुरक्षितता आणि समाजाचे विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.सर्वांनी एकत्र येऊन दिनांक 5/09/2025 शुक्रवार या ऐतिहासिक दिवशी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित असल्याचे मत सर्वच समाज बांधवांनी मांडले…
सदरच्या बैठकीचे आयोजन आणि व्यवस्था अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले होते,या वेळी अकलूज शहरातील बहुतांश सर्वच मशिदीचे प्रमुख जिम्मेदार मंडळी उपस्थित होते…

सालाबाद प्रमाणे अकलूज येथील दर्गा मशीद,जामा मशीद आणि काझी मोहल्ला येथील मशिदीकडे पैगंबर जयंतीचे आयोजन असते,यंदाच्या वर्षी बागवान गल्लीच्या जामा मशीद येथील समाज बांधवांकडे आयोजन आल्याचे ॲड वजीर शेख यांनी सांगितले…
यावेळी बागवान गल्ली जामा मशिदीचे अध्यक्ष जावेद मेंबर बागवान यांनी अकलूज पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक उबाळे साहेब यांचा सत्कार केला आणि पोलीस बबलू गाडे साहेब यांचा सत्कार तनवीर तांबोळी यांनी केला…

सदर बैठकी मध्ये सर्वानुमते दिनांक 5/9 /2025 शुक्रवार रोजी ईद-ए-मिलाद साजरा करण्याचा एक मत झाले.यावेळी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उबाळे साहेब यांनी उपस्थिती दर्शवत मुस्लिम समाजाच्या वतीने साजरी होणाऱ्या पैगंबर जयंतीला शुभेच्छा दिल्या…

या बैठकीसाठी ॲड वजीर शेख,साजिदभाई सय्यद, मोहसीन शेख,मुख्तारभाई कोरबु,जावेद (बाबा) तांबोळी,जुल्करभाई शेख,बाशुभाई शेख,भैय्या माढेकर,मुन्ना चौधरी (BFC),लाला बागवान (ZFC),एजाज बागवान (RFC),शाहबाझ काझी,मंजीत शेख,तनवीर तांबोळी यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते…



