लोकनेते लोकप्रतिनिधी! नगरसेवक विशाल मोरे यांच्याकडून प्रभाग क्र. ३ मधील नागरी समस्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज: दिलेल्या आश्वासनानुसार केवळ सूचना न देता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला प्राधान्य देत, अकलूज नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक ३ चे कार्यतत्पर नगरसेवक विशाल मोरे यांनी प्रभागातील विविध समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या तात्काळ सोडवल्या आहेत. त्यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रभाग क्रमांक ३ मधील महादेव नगर, महाळुंग रोड, कर्मवीर चौक, बाबासाहेब मिनी शॉपिंग सेंटर परिसर, रंजीत नगर आणि समता नगर या भागातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून रस्ते,पाणी,गटारी आणि साफसफाईच्या समस्यांना तोंड देत होते. या तक्रारींची दखल घेत नगरसेवक विशाल मोरे यांनी स्वतः या सर्व ठिकाणांना भेटी दिल्या.

केवळ पाहणी करून न थांबता, विशाल मोरे यांनी उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पावले उचलली. त्यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील व आरोग्य विभागाचे नाना गोरे साहेब यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाचारण केले.
विशाल मोरे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग आणि ठेकेदारांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये:
साचलेल्या कचऱ्याची उचल आणि परिसराची साफसफाई.
तुंबलेल्या गटारींची दुरुस्ती.रंजीत नगर व समता नगर भागातील प्रलंबित नागरी कामांचा निपटारा.

“नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. केवळ कागदावर सूचना न देता, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
— विशाल मोरे, नगरसेवक (प्रभाग क्र. ३)
”समस्या सांगितल्यावर फक्त आश्वासन देणारे नेते अनेक पाहिले, पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदारांना आणून काम करून घेणारा लोकप्रतिनिधी म्हणजे विशाल मोरे,” अशा भावना प्रभाग क्रमांक 3 येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत.



