घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीच्या मुसक्या आवळून तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल सफाळे पोलिसांनी केला जप्त

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीला तीन लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमाला सह अटक करण्यात सफाळे पोलिसांना सोमवारी यश आले आहे.
केळवा रोड येथे राहणारे निलेश तुंबडे यांच्या राहत्या घरातून सोन्याचे तीन लाख 70 हजार रुपये किमतीचे दागिने आणि दिशा मोटर्स हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स नूतन नगर मालक नितेश पाटील राहणार मांडे यांच्या दुकानातून 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करून अज्ञात चोर फरार झाला होता.
हे दोन घरफोडीचे गुन्हे 8 आणि 17 जानेवारी 2026 रोजी सफाळे पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर या गुन्ह्याच्या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक नरळे, आणि पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, पोलीस उपनिरीक्षक दिपविजय भवर, सहाय्यक फौजदार कल्पेश किणी, पोलीस हवालदार निरज शुक्ला, पोलीस हवालदार हरी चौधरी, पोलीस हवालदार लक्ष्मण भोये, पोलीस अंमलदार शिवाजी चिमकर या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सुमन बुल्लू शेख वय वर्ष (44) राहणार वसंत विहार परिजात बिल्डिंग ठाणे याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास व कसून चौकशी केला असता आरोपी सुमन शेख यांनी दोन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिल्यावर आरोपी शेख यांच्याकडून 3 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रक्कम 20 हजार रुपये असा एकूण 3 लाख 90 हजार रुपये किमतीचा दोन्ही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल सफाळे पोलिसांनी जप्त केला आहे.
या आरोपीवर बोईसर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे वापी पोलीस ठाणे गुजरात राज्य येथे एक गुन्हा आणि विरार पोलीस ठाणे येथे एक गुन्हा दाखल आहे. हा आरोपी सराईत गुन्हेगार आहे.
याबाबत पुढील तपास सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस करत आहेत.



