ड्रिंक अँड ड्राईव्ह यूपी वाहन चालकावर सफाळे पोलिसांनी केला गुन्हा दाखल

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
मद्यपान करून दारूच्या नशेत भरधाव वेगाने मोटर वाहन चालवणाऱ्या वाहन चालका विरुद्ध सफाळे पोलिसांनी सोमवारी ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करून त्याचे वाहन जप्त केले आहे.
रामेश्वर चौधरी वय वर्ष( 29) राहणार मूळचा उत्तर प्रदेश पण सध्या तो सफाळे माकणे येथे भाड्याने राहतो.
रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या आसपास पांढऱ्या रंगाची यूपी पासिंग असलेली UP-85-TT-1069 क्रमांकाची बोलेरो गाडी घेऊन तो टेंभीखोडावे येथून सफाळे दिशेने जात होता.

ही गाडी तो बुलेट ट्रेनला वाहतूक सेवा देण्यासाठी वापरत असून रविवारी रात्री रामेश्वर चौधरी मद्यपान करून दारूच्या नशेत वाहन चालवत असताना विटी लाईन रोड वरील विठ्ठलवाडी येथील सुनील म्हात्रे यांच्या घराजवळ असलेल्या विद्युत खांबाला आणि त्याच्या घर संरक्षण लोखंडी भिंतीला जोरदार ठोकर दिल्यामुळे संपूर्ण गेट व लोखंडी खांब्याचे नुकसान झाले आहे.
याबाबत सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी रामेश्वर चौधरी यांच्या विरुद्ध ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करून त्याचे वाहन जप्त केले आहे.



