Uncategorizedमहाराष्ट्र

करमाळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पैलवान सोहेल पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा झाला करमाळा शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी भव्य असा सत्कार संपन्न.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी पैलवान सोहेल पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे करमाळा शहर व तालुक्यातील अनेक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनेने भव्य असा सत्कार केला याशिवाय तालुक्यातील आवाटी उमरड, कंदर, केम, जेऊर या ठिकाणीही त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या समर्थकांनी भव्य असे सत्कार केले राष्ट्रवादी युवकच्या (अजित पवार गट) करमाळा शहर अध्यक्षपदी सोहेल अब्दुल कादर पठाण यांची तर शहर कार्याध्यक्षपदी श्रीराम कारंडे यांची निवड झाली आहे. बुधवारी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवकचे काम करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले. या निवडी सोलापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, राजेंद्र हजारे, करमाळा तालुकाध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, उपाध्यक्ष बापू तांबे आदी उपस्थित होते.

आमचे नेते तसेच मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माझी करमाळा शहर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथमता पवार साहेबांचे आभार मानतो मी करमाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे विचार आचार संपूर्ण करमाळा शहरात रुजवणार असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्या कामी सदैव तत्पर राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोहेल पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली

करमाळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोहेल पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे आवाटी येथील वली बाबा दर्गा मध्ये ट्रस्ट च्या वतीने वली बाबा यांचे शिष्य अर्थात खादीम गुलाम नबी कादरी व इरफान कादरी यांनी पठाण यांचे सत्कार केले याशिवाय आमदार संजय मामा शिंदे, टायगर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव तसेच सकल मुस्लिम जमात, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन, पैलवान यंग ग्रुप, मदारी जमात, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट, अफजल भाई देवळेकर सरकार मंत्रालय मुंबई, फ्रेंड्स मोबाईल शॉपी किल्ला वेस जेऊर मुस्लिम जमात आदींनी पठाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button