अकलूजच्या लेकीचा साताऱ्यात गवगवा…….सातारा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अकलूजची शौर्या भोसले प्रथम
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सातारा जिल्हा परिषदेमार्फत आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत वक्तृत्व स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पाटण तालुक्यातील कोयनानगर केंद्र शाळेतील विद्यार्थिनी शौर्या राहुल भोसले हिने मिळवला. शौर्या ही अकलूज येथील राहुल भोसले सर यांची कन्या असून कोयना विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान या विद्यार्थिनीने मिळवला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एकास एक सरस असे स्पर्धक या स्पर्धेसाठी म.फुले अध्यापक विद्यालय सातारा याठिकाणी आले होते.
पाटण तालुक्याचे नेतृत्व करत वाचाल तर वाचाल! हा विषय घेऊन इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या या चिमुकलीने आपल्या भाषणात मराठी,संस्कृत, हिंदी, व इंग्रजी अशा चारही भाषांचा वापर करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. योग्य हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि उत्तम सादरीकरण करत शौर्याने सर्वच परीक्षकांची मने जिंकली. तिच्या या यशाने पाटण तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला. यानिमित्ताने पाटण तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी दीपा बोरकर मॅडम, केंद्रप्रमुख निकम साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सागवेकर मॅडम व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. याप्रसंगी शौर्याला तिच्या वर्गशिक्षिका सागवेकर मॅडम, वारकड सर, शेळके सर, टारर्फे सर, गुरनुले सर व पावरा सर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.