खंडोबा देवस्थान येथे पोलिसांकडून केली जाते दमदाटी देऊन वसुली
सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत,
टाईम्स 9 मराठी न्यूज,
मो. 8007932121
सातारा : पाल खंडोबा तीर्थ क्षेत्र येथील खंडोबाची यात्रा 22 जानेवारी रोजी झाली आहे, परंतु आज दि 04 फेब्रुवारी रविवार असल्यामुळे भाविक भक्तांची खूप प्रमाणात गर्दी आहे तसेच मोठ्या प्रमाण भविव भक्त आपल्या दुचाकी वरून येत आहे, ही दुचाकी मंदिराच्या परिसात लावली जाते, महत्वाचे म्हणजे ही दुचाकी लावताना ट्रापिक पोलीस जवळ असून सुध्दा काहीही बोलत नाहीत आणि ती व्यकी मंदिरात जाताच गाडीला साखळी लावली जाते, आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे ही साखळी कोणताही पोलीस अधिकारी लावत नाही तर त्यांनी हेमंत इंगळे व यांच्या सोबत 4 व्यक्तींचा समावेश आहे, महत्वाचे म्हणजे या पाचही व्यक्ती आणि पोलीस विभाग यांचा काहीही संबंध नाही हे फक्त त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, प्रत्यक्षात भाविक भक्तांनी हेमंत इंगळे यांना ओळखपत्र विचारले आसता त्यांनी सांगितले ओळख पत्र नाही तुम्हाला जे करायचं ते करा अशी दमदाटीची भाषा वापरली माझा संबंध साखळी लावणे तुम्ही साहेबाना भेटापोलिस अधिकारी शेवटी एका कोपऱ्यात उभा राहून दंड वसुली करतात, भाविक भक्त त्यांना
विचार पूस करण्यासाठी गेला असता त्यांना अधिकारी उत्तर देतात की नो पार्किंग आहे आणि बोर्ड तर त्याठिकाणी कुठेच दिसत नाही मग पोलीस अधिकारी दूरवर नदीच्या पुलावर लावलेली पाठी पुलाच्या कट्यावर लिहिलेले दाखवितात अक्षरशः नदी पुलाच्या कट्यावर लिहिलेली नो पार्किंग दिसतच नाही आणि नदीच्या पुलावरती लावलेला बोर्ड हा पुलावरती नो पार्किंग आहे कारण त्या बोर्ड खाली किती मीटर असे काहीही लिहिलेलं नाही, तरी माझी प्रशासनास अशी विनंती आहे की त्याठिकाणी योग्य आणि स्पष्ट दिसेल असा बोर्ड लावावा आणि भाविक भक्तांकडून चाललेली लूट थांबवावी