ॲड.एम.जी तांबोळी यांना आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने डॉ .बी. आर. आंबेडकर भारतभूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो 9921500780
आज संविधान सन्मान दिवस व वकील डे निमित्त नवी दिल्ली येथे आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन च्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोलापूर जिलह्यातील अकलूज येथील प्रसिद्ध वकील व इंडीयन प्रेस क्लब महाराष्ट्र चे कायदे विषयक सल्लागार व राज्य संघटक ॲड एम. जी .तांबोळी यांना डॉ.बी.आर. आंबेडकर भारतभूषण पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार ३ डिसेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे सत्यनारायण जातीया व मनिष गवई , यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी ग्लोबल फौडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील हा वकिलांना देण्यात येणारा पहिला पुरस्कार आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.अत्यंत गरिब परिस्थीत त्यांनी आपली वकिली परिक्षा देऊन सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. वकिली व्यवसाय बरोबर त्यांनी गरिब मुलांचे शिक्षण,गरिब लोकांच्या मुला मुलींच्या विवाह साठी सतत मदतीचा हात दिला आहे ,
सध्या ते ४० वर्षा पासून अधिक काळ वकिली व्यवसाय करित आहे या सामाजिक कार्याची माहिती घेऊन आंबेडकर ग्लोबल फॉडेशन ने दखल घेऊन हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. सदरचा कार्यक्रम हा डेप्युटी स्पीकर हॉल इन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आला होता.



