महाराष्ट्र

सोलापूर येथे जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा ची आढावा बैठक संपन्न

उपसंपादक — हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार आणि अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष .इद्रीसभाई मुलतानी यांच्या सूचने नुसार व सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण मुक्तार भाई कोरबू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याची आढावा बैठक झाली व संघटनात्मक दौरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव आश्रम वालकर व ॲड.जहीर चौधरी उपस्थित होते भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली

यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली व त्यांची मते जाणून घेतली तसेच संघटनात्मक कार्याबद्दल चर्चा झाली. याप्रसंगी सोलापूर शहर व ग्रामीणच्या वतीने जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मुख्तार भाई कोरबु यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.

भविष्यात पक्षाने दिलेली सर्व कार्य पूर्ण ताकतीने सर्व पदाधिकारी करतील असा विश्वास सर्वांनी दिला. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष मोहसीन शेख, ,महिला शहर अध्यक्षा बिलकीस सय्यद,झाकीर हुसेन,डॉ रफिक सय्यद,झाकीर सगरी,करीम नदाफ,जिशान सय्यद,एजाज सय्यद,शब्बीर शेख,जीलानी सगरी, हबीब सय्यद,सादिक तांबोळी, बाळासाहेब वावरे,सलीम बागवान,सांगली उपाध्यक्ष रियाज वंटमुरे इम्रान पठाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button