महाराष्ट्र

खंडाळी ता. माळशिरस येथील दिव्यांग शेतकरी- राम हरिदास गायकवाड यांची माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ व वेळापूरचे मंडळ अधिकारी संदीप चव्हाण फसवणूक करण्याच्या प्रयत्नात-

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

लोकसेवक पदाचा दुरूपयोग करुन मौजे खंडाळी ता. माळशिरस जि. सोलापूर येथील दिव्यांग शेतकरी राम हरिदास गायकवाड या शेतकऱ्याला माळशिरस चे तहसीलदारसुरेश शेजुळ यांच्या आशीर्वादाने व हुकुमावरून मंडलाधिकारी वेळापूर संदीप चव्हाण यांच्याकडून होणाऱ्या नाहक त्रासामुळे दिव्यांग शेतकरी शारीरिक जीवनाला कंटाळला आहे.त्यामुळे हा शेतकरी कोणत्या ही वेळी टोकाचे पाऊल उचलून जिवीतास धोका करुन घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संदर्भात या शेतकऱ्याच्या वतीने शेतकरी पुत्र आकाश लक्ष्मण पराडे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले असून त्यामध्ये पुढील प्रमाणे उल्लेख केला आहे

मौजे खंडाळी येथील दिव्यांग शेतकरी राम हरिदास गायकवाड या शेतकऱ्यांनी 1987 साली माळी या शेतकऱ्याकडून गव्हर्मेंट स्टॅम्प ड्युटी भरून जमीन खरेदी केलेले असताना व इतर लोकांचा कायदेशिर 427 गट नंबर शी कुठलाही संबंध नसताना सूडबुद्धीने वेळापूरचे मंडल अधिकारी संदीप चव्हाण यांनी विना स्वाक्षरीची आणि त्या नोटीसीमध्ये तारीख न टाकता केवळ सन 2021 चा उल्लेख असून ऑफिसला हजर राहण्याची दिनांक न देता, तुम्हाला या नोटीस पासुन तुमचे रक्षण करायचे असेल तर तहसीलदार सुरेश शेजुळ यांना तूम्ही समक्ष येऊन भेटा असे उत्तर मिळतात. नोटीस मिळाल्यापासून त्यांना आपली जमीन तहसीलदार कोणाला तरी फसवून विकतात कि काय ? असे वाटत असल्यामुळें त्यांच्या मनावर मानसीक परिणाम होऊन शारीरिक त्यांचे संतुलन बिघडत चाललेले आहे.

तरी आपण महसूल मंत्री या नात्याने दीव्यांग शेतकऱ्याला तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या कडून होणाऱ्या नाहक त्रासा पासून मुक्त करावे. आणि अशा शेतकरी विरोधी विचारांच्या अधिकाऱ्यांना आपण आपल्या स्तरावरुन लोकसेवक पदाचा दुरुपयोग करत असल्यामुळें तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.

वरील सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करून दिव्यांग शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी विनंती. शेतकरी पुञ आकाश लक्ष्मण पराडे पाटील यांनी निवेदनामध्ये नमुद केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button