शहर

अकलूज येथील दर्गाह मशिदीत डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी संपन्न –मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा.

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते आज अकलुज येथील विजय चौक , दर्गा मस्जिद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.आण्णासाहेब इनामदार, तालुकाध्यक्ष सतिश पालकर,कॉंग्रेसच्या नेत्या ज्योती ताई कुंभार,अकबरभाई तांबोळी,फिरोज देशमुख,जुल्कर शेख,हुसेनचाचा शेख,बबलू तांबोळी,जावेद तांबोळी, यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम बांधवांबरोबर इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला
याप्रसंगी बोलताना डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील रोजाला अनन्य साधारण महत्व आहे जगाच्या पाठीवर प्रत्येक मुस्लिमांना रोजा करणे अनिवार्य असून रोजा मुळे पाप नाहीसे होऊन पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर रोजा हा आरोग्याच्या दृष्टीने उपाय कारक असून कितीही कठीण प्रसंग आला तरी मुस्लिम बांधव ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रोजा करून परमेश्वराला राजी करण्याचे पुण्याचे काम करतात आणि रोजा मुळे रोजगार करणाऱ्याचे आरोग्य ठणठणीत होते ही उल्लेखनीय बाब आहे

या प्रसंगी अकबरभाई तांबोळी यांच्या हस्ते डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला या इफ्तार पार्टीस अझर तांबोळी,तनवीर मणियार,जावेद तांबोळी,हुसेन शेख,खलील बागवान,जमीर शेख,इब्राहिम मुलाणी,नाशिर मदारी व दर्गा मस्जिद जमातचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते व कार्यक्रमाचे आयोजन अकलूज शहर काँग्रेस पार्टी यांच्या वतीने करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button