शहर

सराईत गुन्हेगारांच्या कोंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या ०२/ पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे हस्तगत

प्रतिनिधी… रियाज मुलाणी

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

दिनांक १७/०२/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्यावर हजर असताना सहा. पो. निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना सायंकाळी १९/०० वा.चे सुमारास खास बातमीदाराने माहिती दिली की, बोपदेव घाटाकडे जाणारे रस्त्याचे चढावर हॉटेल गारवा हिल्स हॉटेलमध्ये एका पांढ-या रंगाच्या चार चाकी गाडीमधुन तीन इसम जेवायला येणार आहेत. त्यांचेजवळ पिस्टल सारखे हत्यार आहे. त्यावेळी मा. संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन यांचे आदेशाने सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस स्टाफ सदर ठिकाणी गेले असता बातमीप्रमाणे खात्री करता सदरची संशयित चार चाकी गाडी ही गारवा हॉटेलचे थोडेसे पुढे घाटाच्या बाजुस गिनी सोसायटीच्या समोरील बांबुच्या कंपाऊंडमध्ये थांबलेली असल्याचे समजल्याने त्याप्रमाणे लागलीच तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व पोलीस स्टाफने सापळा रचुन बातमीप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची चार चारचाकी व तिचे बाजुला तीन इसम गप्पा मारत थांबलेले दिसल्याने त्यांना वरील पोलीस स्टाफने सायं. २०.१५ वा. आहे त्या परिस्थितीत पकडुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) प्रफुल्ल निवृत्ती निकम, वय ४१ वर्षे, रा. मु. पो. साकुर्डी, ता. कराड, जि. सातारा, २) सिमॉन रोमिओ मिरींडा, वय २५ वर्षे, रा. माझीवडा गाव, वेलनकणी बिल्डींग, तळमजला रुम नं. १, ठाणे वेस्ट व ३) समीर भगवान संकपाळ, वय २५ वर्षे, रा. मु. पो. मोप्रे, ता. कराड, जि. सातारा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या तीनही इसमांची अंगझडती घेतली असता १) प्रफुल्ल निवृत्ती निकम याचे कमरेला एक लोखंडी सिल्व्हर रंगाची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे व २) सिमॉन रोमिओ मिरीडा, याचेकडे एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळुन आले त्यांचेकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याने त्यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १७३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर आरोपींकडुन १,०३,०००/- रु. किंमतीचे ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काडतुसे तसेच त्यांचेकडील असलेली १,७५,०००/- रु. कि. ची एक सिल्व्हर रंगाची शेवरोलेट कंपनीची चार चाकी गाडी तिचा आरटीओ रजिस्ट्रेशन नं. एमएच १६/एबी/३८०६ असा एकुण २,७८,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची अग्नीशस्त्रे त्यांनी जवळ का बाळगले याबाबत तपास अधिकारी पो. हवा. सतिश चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.यातील आरोपी यांचेवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याची माहीती खालील प्रमाणे आरोपी क्र. १ याचेवर१)पाटण पो.स्टे २६/२०१९ भादवि कलम ३९५,३९७ अन्वये.,२)कराड ग्रामीण पो.स्टे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) मपोअधि ३७ (३) (१) सह १३५ अन्वये.,३) कराड ग्रामीण पो.स्टे.येथे भादवि कलम ३२६ व अॅट्रॉसिटी कलमांन्वये अन्वये.४)कराड तालुक पो.स्टे ३२७/२०२३ महा प्रोव्हि अॅक्ट कलम ६५ ई..५)कासारवाडी पोस्टे ठाणे गुरनं. १३५४/२०१४ भादवि कलम ३७६ (१),३६३,पोस्को ३,४.,आरोपी क्र. २ याचेवर१)नवपाडा पोस्टे गुरनं. ४५५/२०१८ कलम १८४,१८५,१४६,१९६ ,वरिल नमुद कारवाई मा अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त, मा.मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप-आयुक्त परि.०५. मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, लवेश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसोडे, सुजित मदन, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button