शहर

पालघर मध्ये बालकामगार विरोधी सप्ताह आणि मतदान जनजागृती साठी विद्यार्थ्यांची रॅली

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर येथे कामगार आयुक्त विभागाने अभिनव शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बालकामगार विरोधी- सप्ताह व मनदान जनजागृती कार्यक्रम गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

20 नोव्हेंबर 2024 रोजी पालघर शहरातील नागरिकांनी आपल्या मताचा अधिकार हक्काने पार पडावा यासाठी या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती .

या रॅली मध्ये घोषणाबाजी आणि फलकातून मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.यावेळी कामगार उपआयुक्त चौधरी यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक कामगार आयुक्त दाभाडे,महाले, सरकारी कामगार अधिकारी सिबारे यांच्या उपस्थित व सहाय्यक कामगार आयुक्त दाभाडे यांनी आस्थापनेतील कामगार- अधिकारी यांना मतदान करण्याचे महत्व विशद केले त्याच बरोबर बालकामगार हा दंडनीय गुन्हा आहे असे ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button