राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांची मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट,मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे दिले आश्वासन
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते तसेच मा. संरक्षण मंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब करमाळा येथे आले असता सर्वप्रथम नामदार पवार यांनी मुस्लीम समाज अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी व नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली
यावेळेस मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी सोडवन्यासंबधी चर्चा झाली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांना विजयी करण्यासाठी आम्ही मुस्लिम बांधव पाटील यांच्या मागे भक्कमपणे उभा असल्याचे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी बोलताना सांगितले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांना आम्ही करमाळा शहर तसेच तालुक्यातून मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवू असे श्री तांबोळी यांनी बोलताना सांगितले
मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विजयासाठी करमाळा शहर तसेच तालुका पिंजून काढला असल्याचे श्री तांबोळी यांनी बोलताना सांगितले यावेळी नामदार पवार साहेब तसेच तांबोळी बंधूंमध्ये करमाळा तालुक्यातील राजकारणावर बंद खोलीत चर्चा झाली नामदार शरदचंद्रजी पवार यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने तांबोळी बंधूंच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे नामदार श्री पवार यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब व माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब व शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे सुभाष गुळवे आदी मान्यवर उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे नेते तसेच माजी संरक्षण मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांनी करमाळा येथे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे