महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील जनता अपनी मोहब्बत का नया “इतिहास” लिहिणार…!

🎯 उत्तमराव जानकर यांच्या नावापुढे “आमदार” नावाची संवीधानीक पदवी लागण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी…

सौजन्य सारथी महाराष्ट्र न्युज प्रतिनिधि आमीर मोहोळकर मो.नं. 9890299499

254 माळशिरस विधानसभा मतदार संघाचे भाजपा चे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अकलूज च्या ऐतिहासीक “विजय” चौकात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची जाहीर सभा पार पडली…

या सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना नितीनजी गडकरी साहेब यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराची फिरकी घेत जनते समोर जाताना मते हि जाती च्या जोरावर नाही तर विकासकामाच्या मोबदल्यात मागायची असतात असा सल्लाच जणू राम सातपुते यांना दिला…

नितीनजी गडकरी साहेब यांच्या या वक्तव्याने माळशिरस चे भाजपा चे उमेदवार राम सातपुते यांची मात्र चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले,उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर वेळापूर येथील एका प्रचार सभेत राम सातपुते यांनी मुस्लिम समाजा विषयी जे वक्तव्य केले होते,ते वक्तव्य त्यांना चांगलेच भोवणार असल्याचे चिन्हे सध्या तरी दिसत आहेत…

जो करेगा “जात” की बात हम मारेंगे उसको “लात” असं ठणकावून सांगत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांनी मुस्लिम मतदारांना काय मेसेज पोहचवायचा होता तो पोहचवून ते आपल्या पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले…

एकंदरित पणे जर पहायला गेले तर माळशिरस तालुक्यात आत्ता पर्यंत जितक्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकीत येथील मतदारांनी “मोहिते पाटील” हेच विकासाचा केंद्रबिंदू मानून निवडणुकीला सामोरे गेले होते आणि त्यात त्यांना यश देखील पाहता आले होते…

परंतु राम सातपुते हे पहिले उमेदवार आहेत की,त्यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघातील हिंदु मुस्लिम “एकता” भंग करण्याचा प्रयत्न करत हिंदु मुस्लिम समाज घटकांची नाराजी ओढवून घेतली असल्या कारणाने महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर यांची “तुतारी” जोरात वाजण्याची शक्यता सध्या तरी कोणी नाकारू शकत नाही…

जर देशाच्या एवढ्या प्रमुख पदांवर हिंदू आहेत,तर हिंदू कसे काय खतरे में आहेत,असेल तर आपल्या हातात सत्ता आहे सर्व यंत्रणा आहे मग आपण कारवाई का करत नाही ? याचा अर्थ असा आहे कि,ना हिंदू खतरे में है ना मुस्लिम खतरे में है,खतरे में कोई है तो भाजप है और भाजपा वाले है,मतांच्या राजकारणासाठी ते हिंदू – मुस्लिम असा भेदभाव करीत आहेत…

एक मतदार म्हणून अनेक मतदारांच्या प्रश्नांचे भाजपा वाल्यांनी उत्तर द्यावे…
1) त्या पधरा लाखांचे काय झाले ?
2) त्या काला धनचे काय झाले ?
3) त्या विजय मल्ल्याचे काय झाले ?
4) त्या निरव मोदीचे काय झाले ?
5) अरबी समुद्र येथील शिवस्मारकाचे काय झाले ?
6) इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काय झाले ?
7) स्मार्ट सिटी चे काय झाले ?
8) बदलापूरचा बलात्कार त्याचे काय झाले ?
9) स्वतः आमदार गोळीबार करतो,त्याचे काय झाले ?
10) बैलगाडी भर भ्रष्टाचार कागदे नेले त्याचे काय झाले ?
11) शिवाजी महाराजांचे मालवण स्मारक आठ महिन्यांत कसे पडले,त्याचे काय झाले ?
12)शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल होणार होते त्याचे काय झाले ?
13) गुजरातला किती उद्योग गेले,त्याचे काय झाले ?

पाच वर्षांपूर्वी ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणून मते मागणाऱ्या माळशिरस चे भाजपा चे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी या सर्व बाबींचा खुलासा करावा नाही तर हिंदू मुस्लीम गैरसमज पसरवणे बंद करावे कारण या माळशिरस विधानसभा मतदार संघाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा “परीसस्पर्श” लाभलेला आहे…

पाच वर्षांपूर्वी याच हिरव्या सापांनी आणि याच मस्जिद मदरशा वाल्यांनी “अजातशत्रु” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका शब्दावर एका रात्रीत राम सातपुते यांना एक गठ्ठा मतदान करत आमदार केले होते हे राम सातपुते यांनी कधीच विसरू नये…

राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकी मध्ये हि अशीच जातीय वादाची बीजे रोवण्याचा प्रयत्न केला पण तेथील मतदारांनी वेळीच सावध होत जो निकाल दिला तो सबंध महाराष्ट्राने बघितला आहे…

मोहिते पाटलां विना एकाकी पडलेले राम सातपुते यांनी पराभव स्वीकारल्या मुळेच जाती पाती चे राजकारण सुरु केले असुन माळशिरस तालुक्यातील जनता अशा भूलथापांना कधी बळी पडली नव्हती आणि येथून पुढील काळात कधीच बळी पडणार नाहीय…

माणूस सगळे काही बदलू शकतो परंतु “इतिहास” कधीच बदलू शकत नाही,माळशिरस तालुक्याचा राजकीय इतिहासच मोहिते पाटील यांनी लिहला असुन या वेळी देखील “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी “भूमिपुत्र” म्हणून उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीला पसंती दिली आहे आणि या तालुक्यांतील जनता त्यांना “आमदार” करून इतिहासाचे एक पान सोनेरी अक्षरांनी लिहणार आहे यात मात्र शंका घेण्याचे कुणाचे काम नाही…

गेल्या तेहत्तीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय “संघर्ष” करणारे उत्तमराव जानकर यांच्या नावापुढे “आमदार” हि संवीधानीक पदवी लागण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे हे मात्र तितकेच खरे…

लवकरच पुन्हा भेटू… तूर्तास इतकेच…

अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून Times9 Marathi News चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काहीही संबंध नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button